चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल सहित स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल सहित स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..

नंदुरबार दि. ०३ ऑगस्ट २०२५ (फिरोज खान) :- १६,९५,०६०/- लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आरोपीकडून जप्त दिनांक १०/०४/२०२५ रोजी रोजी फिर्यादी परेश मुकेश कोटारी वय ३५ वर्षे राहणार- अशोक नगर, कांदिवली पूर्व मुंबई हे शहादा येथून शिरपुरला कालीपीली वाहन क्र. MII.१८ N.६५७७ हिच्यात बसून सोन्याचे दागिने विक्री करणेकामी जात असतांना त्यांच्या शेजारी बसलेल्या एका अज्ञात इसमाने फिर्यादी यांनी गाडीच्या कॅरीवर ठेवलेल्या बॅगेतून एकूण १८,५६,३१०/- रु.किं.चे एकुण २१५.८५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लबाडीच्या इराद्याने चोरून नेले म्हणून सारंगखेडा पोलीस ठाणे येथे फौज. गुरनं ११६/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३ (२), ३०३ (c) प्रमाणे दिनांक २८/०६/२०२५ रोजी गुन्हा नोंद आहे.

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना दिनांक ३१/०७/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वरील गुन्हयात फियांदीने सांगितल्याप्रमाणे वर्णनाचा इसम हा शहादा शहरातील धान्यमार्केट परिसरात संशयीतरित्या फिरत असून सदर इसमाचा शोध घेवून गुन्हयासंबधी विचारपुस करणेबाबत पथकास आदेशित केले. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर इसमाचा शोध घेत असतांना सदर इसम हा धान्य मार्केट परिसरातील मागील बाजुस मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मगन चिमा वसावे वय २४ वर्षे राहणार- खरवडचा आगरबारी पाडा ता. धडगाव जि. नंदुरबार असे सांगितले.

त्यास विश्वासात घेवून गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने २-३ महिन्यापुर्वी शहादा-शिरपुर रस्त्याने कालीपीली वाहनात बसला असतांना त्याच्या शेजारी बसलेल्या एका इसमाने गाडीच्या कॅरोवर ठेवलेल्या बॅगेतून सोन्याचे दागिने चोरी केल्याचे सांगितले.

सदर इसमास सारंगखेडा पो.स्टे यांचे ताब्यात देवून त्यास गुन्हयात अटक करून त्याचेकडून गुन्हयातील गेल्या मालापैकी १६,९५,०६०/- रु.किं.चे १९७.१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

सदरची कारवाई नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्रवण दत.एस. अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश वावरे, पोउनि, किरण बाहे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलीस हवालदार पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, पोलीस नाईक विकास कापुरे, अविनाश चव्हाण, पोलीस शिपाई शोएब शेख, सतिष घुले, भरत उगले यांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us