शाहदुल्ला शाह वली बाबा दर्गा समाधीचे गिलाफ़ समाजकंटकांनी जाळले….
नंदुरबार || दि.१६ जुलै || (फिरोज खान)-: नंदुरबार शहरातील बागवान गल्ली भागातील शाहदुल्ला टेकडी येथे शाहदुल्ला शाह वली बाबा दर्गाचे गिलाफ़ समाजकंटकांकडून जाळण्यात आली. नंदुरबार शहर हजरत सैय्यद अलाउद्दिन उर्फ इमाम बादशाह यांचा उरूस साजरा करण्याची तयारी करत असताना शहरातील शाहदुल्ला शाह वली बाबा यांच्या समाधीचे गिलाफ़ जाळून विटंबना करण्यात आली काही काळ तणावपूर्ण शांतता होती.
नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या बागवान गल्ली भागात ही घटना झाली शाहदुल्ला शाह बाबा वली यांच्या समाधीचे गिलाफ़ जाळण्यात आल्याची घटना 15 जुलै सोमवार रोजी सकाळी स्थानिकांना समजले घटनेची माहेती मिळताच एम. आय.एम. पक्ष्याचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष सैय्य्द रफअत हुसैन यांनी पोलीसांना माहिती दिली.
शहरात दरवर्षी इस्लामी महिन्याची अरबी ११ मोहरम या तारखेला ईमाम बादशाह यांचा उरूस साजरे केले जाते. शहरात जातीय अशांतता निर्माण करणे आणि बंधुभावाचे वातावरण बिघडवणे या उद्देशाने असे पाऊल उचलण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले पोलीस विभागाला या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डी. वाय. एस.पी. महाजन, स्थानीक गुन्हे अन्वेषक शाखेचे पोलीस निरीक्षक किरण खेडकर, आणि शहर पोलीसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. थोड्या वेळासाठी बागवान गल्ली परिसराला पोलीस छावणीचे रूप आले होते. फॉरेन्सिक आणि श्वसन पथकालाही पाचारण करण्यात आले होते ,फ़ओरेन्सिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी सापडलेली एक प्लास्टिकची बॉटल जप्त केली आहे ,ज्यामध्ये पेट्रोल सदृश्य असल्याचे दिसून आले आहे.
गेल्या आठवड्यात शहरातील नामांकित व्यक्तीच्या एका अल्पवयीन नातूने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट ठेवला होता ज्याच्या विरोधात शहरातील विविध संघटना आक्रमक झाली होती. सोशल मीडियावर पोस्ट व्हयरल झाल्यानंतर 15 जुलै सोमवार रोजी हिंदू संघटनानी नंदुरबार बंद पुकारला होता, त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी शांतता कमिटीची बैठक घेऊन शांतता राखण्याच्या आव्हान केले होते.
या बैठकीत काहींनी सोमवार शहर बंद पुकारले असल्याचे समजल्याने पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी जातीय सलोखा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे कामी तसे न करण्याचे आवाहन केले होते
परंतु सोमवारी काही लोकांनी शहरात फिरून व्यापाऱ्यांना बंद ठेवणे बाबत दबाव टाकल्याचे समजते नंदुरबार शहरात आक्षेपार्ह व वादग्रस्त पोस्ट टाकल्या संबंधी कायदेशीर कारवाई होऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दर्गेचा पंचनामा झाल्यानंतर शाही इमाम मौलाना मुशफिक आलम यांच्या हस्ते गुलाब पाण्याने धुतले आणि नवीन चादर अर्पण करण्यात आली. तेथे जमलेल्या जमावाला तसेच उलेमा ईकराम आणि जबाबदार लोकांना पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी सांगितले की दोषींना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही असे आश्वासन दिले. नवीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त आल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात दोन नंबरच्या धंद्यावर आणलेली गदामुळे अशा चांगल्या अधिकाऱ्यांना ताबडतोब हटवण्याचे आणि दुसरे म्हणजे देशात धर्मनिरपेक्ष समविचारी लोकांनी विपक्षाची ताकद वाढवली आहे, त्यामुळे एका समाजाला लक्ष्ये करून वारंवार शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र प्रशासनाचा कडकपणा आणि शहरातील सभ्य लोकांमुळे दंगलतंत्र निरुपयोगी झाले आहे सांप्रदायिक यांना संधी मिळेल असे वाटत नाही.