जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे तरुणावर सामूहिक मारहाण — आरोपींवर मकोका लावण्याची एकता संघटनेची मागणी..

जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे तरुणावर सामूहिक मारहाण — आरोपींवर मकोका लावण्याची एकता संघटनेची मागणी..

जळगाव ||दि.१२ऑगस्ट२०२५||{विठ्ठल भालेराव}-: जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे २१ वर्षीय सुलेमान रहीम खान पठाण या तरुणावर अमानुष सामूहिक मारहाणीची घटना घडली असून, गंभीर जखमी झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत जळगाव जिल्हा एकता संघटना तर्फे १२ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

एकता संघटनेने प्रशासनासमोर पुढील मागण्या मांडल्या:

1) घटनेची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी एसआयटीमार्फत करण्यात यावी. 2) दोषींवर तात्काळ कडक कारवाई करून भारतीय न्याय संहितेतील कलमानुसार ९० दिवसांत चार्जशीट दाखल करावी. 3) पीडिताच्या कुटुंबाला किमान ₹२५ लाखांची आर्थिक मदत व एका कुटुंबीयास सरकारी नोकरी द्यावी. 4)मानवाधिकार आयोग व अल्पसंख्याक आयोग यांनी प्रकरणात स्वतः लक्ष घालावे
5) गावात पोलिस बंदोबस्त वाढवून धार्मिक सलोखा टिकवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
संघटनेने इशारा दिला की, दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आणि पीडित कुटुंबाला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.

हे निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना अशोक लाडवांजरी यांच्या हस्ते तर अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना मतीन पटेल यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच अल्पसंख्याक आयोग, मानवाधिकार आयोग व मंत्री ना. गिरीश महाजन यांनाही प्रशासनामार्फत व थेट निवेदन पाठविण्यात आले.

निवेदन देताना उपस्थित — अशोक लाड वंजारी, फारुक शेख, मुफ्ती खालिद, हाफिज रहीम पटेल, अनिस शाह, मतीन पटेल, मौलाना गुफरान, हाफिज इमरान काकर, जामनेरचे जावेद मुल्लाजी, आसिफ इस्माईल, रज्जाक पटेल, कासिम उमर, नजमोद्दीन शेख, आरिफ देशमुख, युसुफ खान व अन्य पदाधिकारी.

Call Us