जळगावात मुस्लिम युवकांची प्रतिभाताई शिंदे यांच्यासोबत विशेष भेट – १७ ऑगस्टला अजीतदादा पवार यांच्या उपस्थितीत ताईंच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश

जळगावात मुस्लिम युवकांची प्रतिभाताई शिंदे यांच्यासोबत विशेष भेट – १७ ऑगस्टला अजीतदादा पवार यांच्या उपस्थितीत ताईंच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश

जळगाव || दि.१५ ऑगस्ट २०२५ || (विठ्ठल भालेराव)-: शहरातील विविध भागातील अल्पसंख्याक मुस्लिम युवकांनी आज (शुक्रवार) दुपारी ३ ते ५ वाजेच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव जिल्ह्याच्या प्रबळ नेत्या आणि जनतेच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रतिभाताई शिंदे यांची विशेष भेट घेतली.

ताईंच्या नेतृत्वगुणांवर आणि सामाजिक कार्यावर प्रभावित होऊन, युवकांनी १७ ऑगस्ट रोजी जळगावात आगमन होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजीतदादा पवार यांच्या हस्ते, प्रतिभाताईंच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या भेटीत शकील मेमन, हुजेफ कादरी, जहीर शेख, इरफान नूरी, सुफियान बागवान, अन्नू भाई, साजिद शाह, रियाज काजी, दिशांत शेख, टीपू खान यांच्यासह शहरातील अनेक भागातील तरुण सहभागी झाले. सर्वांनी एकमुखाने ताईंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, अजीतदादांच्या स्वागतासाठी उत्साहात तयारी करण्याचे ठरवले.

बैठकीदरम्यान, अल्पसंख्याक मुस्लिम युवकांच्या विविध प्रश्नांवर ताई शिंदे यांनी सविस्तर चर्चा केली आणि समस्यांवर मार्ग काढण्यासाठी ठोस भूमिका मांडली. त्यांच्या मार्गदर्शनातून युवकांना केवळ राजकीय दिशा नव्हे तर सामाजिक बांधिलकीची जाणही मिळाल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

प्रतिभाताई शिंदे यांच्या थोर नेतृत्वामुळे, जळगावातील युवकांमध्ये नवा आत्मविश्वास आणि जनतेसाठी कार्य करण्याची उर्मी जागृत होत आहे.

बैठकीदरम्यान अल्पसंख्याक मुस्लिम युवकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली आणि भावी राजकीय कार्यक्रमांसंदर्भात प्रतिभा ताई शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

Call Us