दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

नंदुरबार || दि.१७ जुलै२०२४ || (फिरोज खान)-: समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी आणि कायद्याचे राज्य अबाधित राहावे यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष आहे.

कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरू आहे, सोशल मीडिया माध्यमांचा दुरुपयोग करून तसेच पवित्र असलेल्या धार्मिक ठिकाणी चादर जाळून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व घडलेल्या गुन्ह्यामधील आरोपीस अटक करण्यात नंदुरबार जिल्हा गुन्हे शाखा व शहर पोलिसांन यश आले आहेत.

१४ जुलै रोजी नंदुरबार शहरातील बागवान गल्ली भागातील शाहदुल्ला टेकडी येथे दर्गेचे गिलाफ़ जाळण्याची घटना घडली होती.

तसेच शेख नासीर शेख हनीफ यांची सायकल दुरुस्तीची दुकान आहे त्यांच्या ९ सायकलींना आग लावून सुमारे २० ते २२ हजार रुपयांचं नुकसान करण्यात आले होते हे दोन्ही कृत्य दोन समाजात तेढ निर्माण करणारे होते.

नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गु.र.नं.४२६ /२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९८ गुन्ह्यातील आरोपीने बागवान गल्ली भागातील शाहदुल्ला शाह वली बाबा दर्गेचे गिलाफ़ जाळले व शाहदुल्ला मशीदच्या बाजूला शेख नासीर शेख हनीफ खाटिक यांचे बुलंदी नाव असलेल्या सायकल दुकाना समोरील २०ते २२ हजार रुपये किमतीच्या ९ सायकलींना अज्ञात व्यक्तीने आग लावून नुकसान करून दोन सामाजिक तेढ निर्माण होवून सार्वजनिक शांतता भंग करण्याचे कृत्य केले म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं.४२९ / २०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३२६ ( फ ) १९६ ( १ ) ( ब ) ३२४ ( ४ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नंदुरबार शहरचे पोलीस पथक झालेल्या घटनांपासून त्याचा शोध घेत होते. सदरची घटना नागरिकांच्या धार्मिक भावनेशी संबंधीत असल्यामुळे तसेच जातीय दृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे घटनेची माहिती मिळताच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. नंदुरबार उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून पाहणी केली होती. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर घटनास्थळावर काही संशयास्पद वस्तु मिळून आल्यानंतर त्यास तपासकामी जप्त करण्यात आल्या होत्या.

सदर दोन्ही घटना जातीयदृष्टया संवेदनशील असल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याची वेगवेगळी तपास पथके तयार करून दोन्ही गुन्ह्यातील अज्ञात आरोपींना तात्काळ अटक करणेकामा करीता निर्देश दिले होते. सदर आरोपीला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने पोलीस पथकाने सापळा रचून आरोपी नाव कल्पेश रवींद्र कासार वय ३० राहणार तांबोळी गल्ली नंदुरबार याला ताब्यात घेतले आहे.

सदर प्रकरणा बाबत त्याला विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने दोन्ही गुन्हे केले असल्याचे कबुली दिली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी यास सदरचे कृत्य करण्याकरिता कोणी भाग पाडले आहे व कसे ? या बाबत चौकशी सुरू आहे. गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या कोणीही असो त्याची गय न करता दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी सांगीतले.

सदरची ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरण खेडकर,नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक विकास गुंजाळ, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक राकेश मोरे, पोलीस अंमलदार विजय ढीवरे, आनंदा मराठे, अभय राजपूत, तसेच नंदुरबार पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक बलविंदर ईशी, पोलीस अंमलदार किरण मोरे, कल्पेश रामटेके, राहुल पांढरकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us