शासन मुस्लिम समाजाकडे दुर्लक्ष करत आहे – ५% आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी – ऐकता संघटनेची मागणी…
जळगाव || दि. ३ सप्टेंबर २०२५ || (वसीम शेख) :- महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण प्रश्नावर शासनाने सकारात्मक भूमिका घेत ८ पैकी ६ मागण्या मान्य केल्या. ही बाब स्वागतार्ह आहे. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं विधान – “शासन सर्व समाजाला समान वागणूक व न्याय देईल” – हे ऐकून मुस्लिम समाजातही आशा निर्माण झाली आहे.

परंतु, माननीय उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाला ५ टक्के शैक्षणिक आरक्षण मान्य केलं असतानाही, शासनाने अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. इतकेच नव्हे तर कोणत्याही राजकीय पक्षाने या विषयावर ठोस भूमिका घेतलेली नाही, ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे एकता संघटनेचे फारुक शेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुस्लिम समाजातील विद्यार्थी व युवकांना शिक्षण व रोजगार क्षेत्रात प्रचंड अन्याय सहन करावा लागत आहे.
न्यायालयाचा निकाल असूनदेखील शासनाने तो लागू न करणे हे न्यायालयाचा अवमान ठरतो. या पार्श्वभूमीवर आज एकता संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुफ्ती खालिद, फारुक शेख यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या :
१)उच्च न्यायालयाने मान्य केलेलं मुस्लिम समाजासाठीचं ५% शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करावं. २)मराठा समाजाला जसा न्याय मिळाला, तसाच न्याय मुस्लिम समाजालाही मिळावा. ३) मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या “सर्व समाजाला समान वागणूक व न्याय” या विधानाची अंमलबजावणी प्रत्यक्षात दिसावी. ४) या संदर्भात शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी.
अन्यथा मुस्लिम समाजाला न्याय मिळवण्यासाठी तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा एकता संघटनेने निवेदना द्वारा दिला आहे.
एकता शिष्टमंडळात यांचा होता समावेश..
मुफ्ती खालिद, फारुक शेख, हाफिज रहीम पटेल, अनिस शाह, नदीम मलिक, अन्वर शिकलगर,मजहर पठाण, मतीन पटेल , उमर कासिम ,नजमुद्दीन शेख,
