अन्यायग्रस्त कोळी आदिवासी जमातीच्या न्यायहक्कासाठी संजय भाऊ कांडेलकर यांचे आमरण उपोषण सुरू…..
मुक्ताईनगर/जळगाव || ०५ सप्टेंबर २०२५ || {कैलास कोळी}-: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रात आनंद आणि उत्साहाचे वातावरण असताना, कोळी आदिवासी समाजाचे नेते श्री. संजय भाऊ प्रल्हाद कांडेलकर यांनी आपल्या समाजाच्या न्यायहक्कासाठी मुक्ताईनगर येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
आपल्या जमातीच्या हक्कासाठी आणि शासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षीही सलग 26 दिवस उपोषण करून त्यांनी आपल्या समाजाच्या प्रश्नांना शासन दरबारी पोहोचवले होते. आता पुन्हा एकदा समाजहितासाठी जीवाचा आटापिटा करणारे हे लढवय्ये कार्यकर्ते 2 ऑक्टोबर 2025 पासून उपोषणावर बसले आहेत.

आज उपोषणाचा चौथा दिवस असून, संजय भाऊ कांडेलकर यांनी चार दिवसांपासून अन्नाचा एकही कण घेतलेला नाही. ते आपल्या घर-दाराचा त्याग करून समाजाच्या न्यायासाठी शासनाविरोधात लढा देत आहेत. मात्र, अद्याप प्रशासनाने त्यांच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही.

मुक्ताईनगर तालुक्यातील तसेच संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व कोळी आदिवासी समाज बांधवांना आवाहन करण्यात आले आहे की —
👉 संजय भाऊंच्या उपोषणाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा,
👉 शासनावर आणि प्रशासनावर दबाव निर्माण करा,
👉 तसेच जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय व प्रांत कार्यालय येथे निवेदन देऊन आपल्या समाजाचा आवाज बुलंद करा.
संजय भाऊ कांडेलकर यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली असून, प्रशासनाने या आंदोलनाची तात्काळ दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे.
समाज बांधवांनी एकजुटीने पाठिंबा देऊन आपल्या न्यायहक्कासाठी लढणाऱ्या संजय भाऊंना बळ द्यावे, असे आवाहन मुक्ताईनगर तालुका समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.
