वरणगावजवळील सुसरी शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; ओळख पटवण्याचे आवाहन…
वरणगाव/भुसावळ || दि.२३ नोव्हेंबर || (कैलास कोळी)-: वरणगाव जवळील सुसरी शिवारात आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाच्या गळ्यात लांब पांढऱ्या रंगाचा रुमाल बांधलेला आढळला असून अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटवता आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्राथमिक तपास सुरू असून मृत्यू आत्महत्या आहे की काही वेगळा संशयास्पद प्रकार, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.
ओळख न पटल्याने वरणगाव पोलीस स्टेशनचे पोलिस सहाय्यक फौजदार श्रावण जवरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सदर मृत व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ पोलीसांना कळवावी.
ज्यांना या व्यक्तीची ओळख, राहत्या ठिकाणाबाबत किंवा संबंधित माहिती असल्यास त्वरित खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे —
📞 8999489288
☎️ 02582 / 262333
