कोल्हापूरमधील विशालगड मशीदीच्या तोडफोडीवर निषेध; अमळनेर ईदगाह मुस्लिम कब्रस्तान ट्रस्ट, अल्पसंख्यांक विकास हक्क फाउंडेशनकडून कठोर कारवाईची मागणी…
अमळनेर || दि. २२ जुलै२०२४ || (रिजवान मन्यार) :- कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड येथील मशीदीवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अमळनेर ईदगाह मुस्लिम कब्रस्तान ट्रस्ट आणि अल्पसंख्यांक विकास हक्क फाउंडेशनने केली आहे.
या संस्थांनी आज दि 22 रोजी अमळनेर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की, आरोपींवर त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच, मशीदीचे नुकसान भरपाई करण्यात यावे आणि हल्ल्यावेळी उपस्थित असलेल्या निष्क्रिय पोलीसांवरही कारवाई करण्यात यावी.
निवेदनात म्हटले आहे की, “विशालगड येथील मशीदीवर हल्ला करून समाजकंटकांनी अल्पसंख्याक मुस्लिमांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच राज्यात जातीय तेढ निर्माण करून अशांतता पसरवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. या हल्ल्यात मशीदीतील साहित्य आणि पवित्र ग्रंथांचीही नासधूस करण्यात आली आहे. तसेच, निरपराध नागरिक, लहान मुले आणि महिलांनाही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा अमळनेर मुस्लिम समाज आणि अल्पसंख्यांक विकास हक्क फाउंडेशनने तीव्र निषेध केला आहे.
या निवेदनावर स्वाक्षरी हाजी नासिरोद्दीन शेख, अध्यक्ष, अमळनेर मुस्लिम शहर कमेटी, सैय्यद अजहर अली, सईद हाजी, नाविद शेख,अल्तमश शेख, आकीब अली, अख्तर अली,जुबेर पठाण, इम्रान भाया, मा.नगरसेवक फिरोज पठाण, मा.नगरसेवक सलीम टोपी, आरिफ भाया, हाजी दबीर पठाण, साबीर पठाण, मुख्तार खाटीक, इम्रान खाटीक, ऍड, शकील काझी गुलाम नबी पठाण, सौय्य आबीद अली, मुश्ताक शेख, इम्रान कादर शेख, ताहेर शेख, रियाज मौलाना, आरिफ पठाण, बशीर शेख, ईबा सैय्यद, अल्ताफ राजा, अरशद पठाण, वलीद शेख, शाहिद शेख,नाईम पठाण , मोसीन शेख,सलमान शेख, आदी व विशेष उपस्तिथी संदीप घोरपडे, के डी पाटील, मनोज पाटील, डॉ,अनिल शिंदे, अशोक पवार, गुकोळ बोरसे, सर,तिल्लोतमा ताई, ब के सूर्यवंशी, भागवत गुरुजी, प्रवीण जैन. होते