रजा मशिदीचे मौलाना साबीर यांचे करंट लागून दुःखद निधन; दोन मुलींनाही करंट..
जळगाव || दि. ०५ डिसेंबर २०२५ || (प्रतिनिधी)-: रजा मशिदीचे मौलाना साबीर यांचे आज सकाळी करंट लागून निधन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुर्दैवाने, या दुर्घटनेत त्यांची दोन मुलीही करंटला झळाल्या. त्यापैकी एका मुलीचा जागीच मृत्यू झाला असून दुसरी मुलगी गंभीर जखमी असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, घरात अचानक इलेक्ट्रिक करंटचा तीव्र प्रवाह झाल्याने मौलाना साबीर आणि त्यांची मुले यांना धक्का बसला. शेजाऱ्यांनी तत्काळ मदत करत तिघांना रुग्णालयात हलविले मात्र मौलाना साबीर आणि एका मुलीला वाचवता आले नाही.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. रजा मशिदीतील लोकांसह संपूर्ण मुस्लिम समाजाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. पोलीस व वीज विभाग या घटनेचा पुढील तपास करत आहे.
