राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; १५जानेवारीला मतदान,१६ जानेवारीला निकाल..
मुंबई || १५ डिसेंबर २०२५ || (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आज 15 डिसेंबर 2025 रोजी पत्रकार परिषदेत राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांमध्ये मुंबई महानगरपालिका (BMC)सह राज्यातील सर्व प्रमुख महापालिकांचा समावेश आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मतदान 15 जानेवारी 2026 रोजी व मतमोजणी आणि निकाल 16 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पार पडणार आहे.
🏙️ या महानगरपालिकांचा समावेशया निवडणुकांमध्ये 1. अहिल्यानगर महानगरपालिका
2. अकोला महानगरपालिका
3. अमरावती महानगरपालिका
4. भिवंडी-निजामपूर महानगरपालिका
5. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
6. चंद्रपूर महानगरपालिका
7. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
8. धुळे महानगरपालिका
9. इचलकरंजी महानगरपालिका
10. जळगाव महानगरपालिका
11. जालना महानगरपालिका
12. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
13. कोल्हापूर महानगरपालिका
14. लातूर महानगरपालिका
15. मालेगाव महानगरपालिका
16. मीरा-भाईंदर महानगरपालिका
17. नागपूर महानगरपालिका
18. नांदेड-वाघाळा महानगरपालिका
19. नाशिक महानगरपालिका
20. नवी मुंबई महानगरपालिका
21. पनवेल महानगरपालिका
22. परभणी महानगरपालिका
23. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
24. पुणे महानगरपालिका
25. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका
26. सोलापूर महानगरपालिका
27. ठाणे महानगरपालिका
28. उल्हासनगर महानगरपालिका
29. वसई-विरार महानगरपालिका
या महानगरपालिकांचा समावेश आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आज पासुन आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांना आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच मतदानापूर्वी मतदार यादी अंतिम करण्यात येणार असून मतदारांना आपली नोंद ई-व्होटर यादीत तपासता येणार आहे.
ही महापालिका निवडणूक दीर्घ कालावधीनंतर होत असून, याआधी प्रशासकीय व न्यायालयीन कारणांमुळे ती रखडली होती.या निवडणुकांचे निकाल राज्यातील राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव टाकणारे ठरण्याची शक्यता आहे. शहरांचा कारभार, विकासकामे व स्थानिक निर्णय प्रक्रियेत महापालिकांची भूमिका महत्त्वाची असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
##मतदान: 15 जानेवारी 2026…
##वेळ: सकाळी 7 ते संध्याकाळी 6….
##निकाल 16 जानेवारी 2026…
राज्य निवडणूक आयोगाकडून मतदान व मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
