पोलीस शिपाई पदासाठीचे पात्र 1858 उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक 28 जुलै रोजी सकाळी आयोजित करण्यात आलेली आहे…
नंदुरबार || दि.२५ जुलै २०२४ || (फिरोज खान) -: नंदुरबार जिल्हा पोलीस आस्थापनेवरील रिक्त असलेल्या 151 पोलीस शिपाई पदाचे भरती प्रक्रियेतील शारीरिक व मैदानी चाचणी दिनांक 19/06/2024 ते 06/07/2024 या कालावधीत पोलीस कवायत मैदान, नंदुरबार या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. मैदानी चाचणीत 50 टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवारांमधून जाहिरातील नमुद केलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात प्रवर्गनिहाय 1858 उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत.
नंदुरबार जिल्हा पोलीस पोलीस भरती-2022-2023 मधील पोलीस शिपाई पदासाठीचे पात्र 1858 उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक 28/07/2024 रोजी सकाळी 11.00 ते 12.30 वा. या वेळेत
1) जी.टी.पाटील कॉलेज, नंदुरबार
2) यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार
3) एन.टी.व्ही.एस. विधी (Law) महाविद्यालय, नंदुरबार
4) श्रीमती हिराबेन गोविंददास श्रॉफ हायस्कुल, नंदुरबार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे.
लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना सर्वसाधारण सूचना या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ www.nandurbar.mahapolice.gov.in यावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.
तसेच लेखी परीक्षेकरीता बाहेरगावाहून येणाऱ्या पुरुष उमेदवारांकरीता अहिल्या गेस्ट हाऊस व महिला उमेदवारांकरीता मंगलम गेस्ट हाऊस, टोकर तलाव रोड, पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथे निःशुल्क राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.