२६ हजाराची लाच घेतांना अक्कलकुवा पंचायत समिती गट विकास अधिकारी व सहाय्यक लेखापाल रंगेहात अटक
नंदुरबार || दि.२५ जुलै २०२४ || (फिरोज खान)-: तक्रारदार यांनी पंचायत समिती अक्कलकुवा व ग्रामपंचायत डाब अंतर्गत एकूण तीन अंगणवाड्या यांचे बांधकाम पूर्ण केले आहे
तिन्ही अंगणवाड्या यांचे कामांच्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी यांनी रवींद्र सुखदेव लाडे सहाय्यक लेखापाल पंचायत समिती अक्कलकुवा यांना वेळोवेळी पाठपुरावा केला
परंतु तक्रारदार यांची बिलाची रक्कम सहायक लेखापाल यांनी ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केला नाही
यानंतरही तक्रारदार यांनी वेळोवळी पाठपुरावा केला असता सहायक लेखापाल रवींद्र सुखदेव लाडे यांनी तक्रारदार यांच्या एका कामाचे बील २ लाख ४६ हजार ८५० रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केले जे तक्रारदार यांना बँक खात्यात मिळाले
परंतु सहाय्यक लेखापाल यांनी तक्रारदार यांचे एक बील काढून दिल्याचा मोबदला व उर्वरित दोन बिलांची रक्कम काढण्यासाठी अशा एकूण तिन्ही बिलांच्या रक्कमेबाबत तक्रारदार यांच्याकडून स्वतः साठी ८ हजार रुपयेची मागणी केली
दिनांक २५ जुलै रोजी पंचांसमक्ष केलेल्या सापळा कारवाई दरम्यान सहाय्यक लेखापाल रवींद्र लाडे ८ हजार रुपये लाचेची रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली
तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती अक्कलकुवा यांनी तक्रारदार यांच्याकडून १८ हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारून सहाय्यक लेखापाल यांच्याकडून लाच मागण्याच्या व लाच स्वीकारण्याच्या कृतीस प्रोत्साहन दिले म्हणून गुन्हा दाखल
सदरची ही कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे – वालावलकर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक ,माधव रेड्डी अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक ,स्वप्नील राजपूत वाचक पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश चौधरी पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार, पोलीस हवालदार विकास पाटील, विजय ठाकरे, पोलीस नाईक देवराम गावीत ,हेमंत कुमार महाले , सुभाष पावरा ,नरेंद्र पाटील, जितेंद्र महाले यांनी केली आहे
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नंदुरबार येथे संपर्क करावा.
दुरध्वनी क्रमांक-
02564-230009,
टोल फ्री क्रमांक १०६४ .