धुळे जिल्हा पोलिसांची अचानक विशेष मोहिम; असामाजिक घटकांवर मोठी कारवाई….
धुळे || दि.२५ फेब्रुवारी २०२६ ||(समीर शेख) -: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी धुळे जिल्हा पोलिसांनी 24 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 ते रात्री 11 वाजेदरम्यान अचानक विशेष मोहिम राबवली.
मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन प्रभारी, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस ठाणे आणि शहर वाहतूक शाखेला विशेष निर्देश देण्यात आले होते.
मोहिमेतील ठळक कारवाई..
ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह: 22 केसेस, 2 लाख 20 हजार रुपयांचा दंड
मोटार वाहन कायदा: 245 केसेस, 1 लाख 56 हजार 150 रुपयांची वसुली
अनऑथराईज सायलेन्सर (बुलेट): 18 केसेस, 18 हजार रुपयांचा दंड
सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन व शांततेचा भंग: 9 केसेस
सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण: 8 केसेस
पानटपरीवर अमली पदार्थ विक्री: 33 केसेस
कोटपा कायद्यान्वये कारवाई: 7 केसेस
अवैध हातभट्टी दारू: 32 आरोपींवर गुन्हे दाखल
अवैध दारूविरोधी मोठी कारवाई
पोलिसांनी 540 लिटर गावठी हातभट्टी दारू, रसायन, वॉश व साहित्य जप्त केले. एकूण 47 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जप्त केलेली दारू जागीच नष्ट करण्यात आली.
जुगार प्रकरणी कारवाई..
महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये 32 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 16 हजार 50 रुपयांची रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले.
शहर वाहतूक शाखेची विशेष कारवाई शहर वाहतूक शाखेने 12 ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह केसेस करून 1 लाख 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच 4 तपासणी नाके उभारून 146 वाहनांवर कारवाई करत 85 हजार 850 रुपयांचा दंड आकारण्यात आला.
यामध्ये लायसन्स नसणे, नो-एंट्रीमध्ये प्रवेश, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, विना सीट बेल्ट वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, अतिरिक्त प्रवासी वाहतूक आदी प्रकारांवर कारवाई करण्यात आली.
इतर तपासण्या..
139 बार, ढाबे, हॉटेल, लॉजेस व गेस्ट हाऊस तपासणी
5 OYO हॉटेल तपासणी
6 नदी किनारी तपासणी
325 दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी
23 ठिकाणी नाकाबंदी
तसेच मोकळी मैदाने, नदीकाठ, रिकाम्या शाळा परिसरात मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
वॉरंट बजावणी, पाहिजे आरोपींची धरपकड व हिस्ट्रीशीटरांची तपासणीही करण्यात आली.
पुढील कारवाईचा इशारा
धुळे जिल्हा पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, पुढेही अशाच प्रकारे अचानक विशेष मोहिमा, नाकाबंदी, कोंबिंग ऑपरेशन व “ऑपरेशन ऑल आऊट” राबवून गुंडगिरी व असामाजिक कृत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
