सर सय्यद अहमद खान लायब्ररी, जळगाव येथे मराठी भाषा दिन उत्साहात साजरा….
जळगाव ||दि. २७ फेब्रुवारी २०२६ || {विठ्ठल भालेराव}-: आज दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सर सय्यद अहमद खान लायब्ररी येथे मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमानिमित्त मराठी भाषेतील विविध पुस्तकांचे वाचन करण्यात आले. उपस्थित वाचकांनी मराठी साहित्याचा आस्वाद घेत मातृभाषेप्रती आपुलकी व्यक्त केली.
यावेळी अल्पसंख्यांक सेवा संघटना चे प्रदेशाध्यक्ष जहांगीर ए. खान यांनी आपल्या मनोगतात मराठी विषयाचे महत्त्व अधोरेखित केले. मातृभाषा ही व्यक्तिमत्त्व विकासाची पायाभूत शक्ती असून तिच्या जतन व संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात वाचनालयाचे सचिव अब्दुल राऊफ शेख यांनी शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी वाचनालयाच्या वतीने लहान मुलांना वयोगटानुसार पुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडला. लहानपणापासून वाचनाची सवय लागल्यास विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास अधिक सक्षम होतो, असे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी वाचनालयाचे ग्रंथपाल ईद्रीस शेख तसेच कर्मचारी व सदस्य नेहाल कमील शेख, शोहेब शेख, हाशम रशीद शेख, हारून शेख, नोमन मलिक, इब्राहिम पटावे आणि वाचक मुले-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण उत्साही आणि प्रेरणादायी होते.
