प्रताप महाविदयालयाच्या गणित विभागाच्या विदयार्थ्यांची पदव्युत्तर शिक्षणासाठी IIT दिल्ली येथे निवड….
अमळनेर || दि.१ ऑगस्ट २०२४ || (रिजवान मन्यार) :- प्रताप महाविदयालयाच्या गणित विभागातील दिनेश विलास माळी या विद्यार्थ्यांची M.SC गणित साठी IIT दिल्ली येथे निवड झाली सदर निवड साठी विद्यार्थ्यांना IIT JAM सारखी परिक्षा घेण्यात येते. सदर परिक्षा ही भारतातील पदवी प्राप्त विद्यार्थी पदव्युत्तर प्रवेशासाठी घेण्यात येते. महाविद्यालयाच्या गणित विभागातील 2 विद्यार्थ्यांनी यावर्षी ही परिक्षा पास केली आहे. या यशाबद्दल दिनेश माळी यांचे प्राचार्य डॉ . अरुण जैन खा शि मंडळाचे संचालक हरिअण्णा वाणी तसेच सर्व संचालक मंडळ सहसचिव प्रा. धिरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ. अमित पाटील, डॉ कल्पना पाटील, डॉ.तूंटे, प्रा. पराग पाटील, डॉ.विजय मांटे, डॉ. जे बी पटवर्धन, डॉ योगेश तोरवणे यांनी अभिनंदन व कौतुक केले.
गणित विभाग प्रमुख डॉ. नलिनी पाटील ,डॉ. वंदना पाटील ,प्रा. रोहन गायकवाड. विदयार्थ्यांना स्पर्धा परिक्षा मध्ये यश मिळणेसाठी विभागातील सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. विभागातील यापूर्वी देखील 2 विदयार्थ्यांनी उत्तम रँक वर ही परिक्षा उत्तीर्ण केली आहे. यामुळे महाविदयालय व विद्यापीठ स्तरावरून विदयार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.