स्वातंत्र्य दिनी अमृतसररोवरांच्या स्थळांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करावेजिल्हाधिकारी धनंजय गोगटे
नंदुरबार :- दिनांक १० ऑगस्ट २०२४ (फिरोज खान) भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यातील अमृत सरोवरांच्या स्थळांवर ध्वजारोहण समारंभ, तिरंगा यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, संवाद सत्र, या सारख्या उपक्रमातून हा दिवस जन-उत्सव म्हणून आयोजित करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील अमृत सरोवरांच्या ठिकाणांवर ध्वजारोहण समारंभ आयोजित करून त्यानंतर राष्ट्रगीत गायन करण्यात यावे. ग्रामस्थांच्या वतीने सकाळी ‘तिरंगा यात्रा काढण्यात यावी, ही “तिरंगा यात्रा” गावातील / पंचायतीचे मुख्य रस्त्यांवरून मिरवणूकीच्यी स्वरूपात काढण्यात यावी व या मिरवणूकीचा समारोप अमृत सरोवरच्या ठिकाणी करण्यात यावा. स्थानिक शालेय विद्यार्थी आणि समुदायांद्वारे देशभक्तीपर गाणी, मूल्य आणि स्किट्स दाखवणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावे.पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण मोहीम सुरू करण्यात यावी व शाश्वत पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात यावे. स्वच्छ भारत अभियानाला चालना देण्यासाठी आणि सार्वजनिक जागा स्वच्छ व हरीत राखण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी विशेषतः अमृत सरोवर स्थळांच्या आसपासच्या स्वच्छता मोहिमेत स्थानिक समुदायाला सहभागी होण्याकरीता प्रेरीत करण्यात यावे.स्वातंत्र्य दिनाचे महस्व, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचे महत्व इ. विषयांवर प्रश्नमंजुषा, वादविवाद है. परस्परसंवादी सत्रे आयोजित करण्यात यावे.भारतीय स्वातंत्र्य दिन जन-उत्सव म्हणून साजरा करण्याच्या अनुषंगाने सर्व अमृत सरोवरांच्या स्थळांवर शाळा, समुदाय गट आणि सरकारी अधिकाऱ्यांसह स्थानिक लाभधारकांना सहभगी होण्याकरीता क्षेत्रीय स्तरावरून आवाहन करण्यात यावे. अमृत सरोवरांच्या स्थळांवर आयोजित केलेल्या विविध उपक्रामयाचतची माहिती छायाचित्रांसह “अमृत सरोबर” मोबईल अॅपच्या माध्यमातून अपलोड करण्यात यावी. प्रत्येक उपक्रमाचे किमान १ छायाचित्र अपलोड करावयाचे आहे. उदा. ध्वजारोहण समारंभ, तिरंगा यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षारोपण मोहीम, स्वच्छता मोहीम, संवाद सत्र यांचे छायाचित्र अपलोड करण्याची मुदत ३० ऑगस्ट, २०२४ पर्यंत राहिल, असेही जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी कळवले आहे.