जळगावातील इरफान इसहाक बागवान बेपत्ता; नागरिकांना शोधकार्यात सहकार्य करण्याचे आवाहन
जळगाव || दि. ०१ ऑगस्ट २०२६ || {रियाज खान}-: जळगाव शहरातील बागवान मोहल्ला भागतील जोशी पेठ परिसरात राहणारे इरफान इसहाक बागवान (बेटावदवाले) हे दि. 31 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4.00 वाजल्यापासून बेपत्ता आहेत. ते घरातून बाहेर पडल्यापासून अद्याप घरी परतलेले नसून त्यांच्या कुटुंबीयांकडून तसेच नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून सर्वत्र त्यांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, अद्याप त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
कुटुंबीयांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबविली असून नातेवाईक, मित्र तसेच परिचितांकडे चौकशी करण्यात आली आहे. मात्र कोणतीही ठोस माहिती मिळालेली नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
इरफान इसहाक बागवान यांच्याबाबत कोणालाही कोणतीही माहिती मिळाल्यास किंवा ते कुठेही दिसल्यास, कृपया वेळ न दवडता खालील क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.
संपर्क क्रमांक :
- रईस भाऊ – 9423490405
- शोएब – 9766255854
- अशफाक – 9422555523
- इम्रान – 9421001078
नागरिकांनी ही माहिती जास्तीत जास्त शेअर करून बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सहकार्य करावे. आपल्या एका फोनमुळे किंवा दिलेल्या माहितीमुळे इरफान इसहाक बागवान सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे कोणतीही उपयुक्त माहिती असल्यास तात्काळ वरील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
