धुळे तालुका पोलीसांची कामगिरी जळगांवात चोरीस गेलेली स्विफ्ट गाडी केली हस्तगत
धुळे :- दि.16 ऑगस्ट ( प्रतिनिधी ) जिल्हापेठ पोलीस ठाणे, जळगांव येथे दिनांक-11/07/2024 रोजी दाखल असलेला अपराध क्रमांक- 221/2024 भारतीय न्याय संहिता कलम-303 [2] प्रमाणे दाखल असुन दिनांक-09/07/2024 रोजीचे रात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तिने तक्रारदार बिपीन मनोजकुमार कावडीया वय-31 रा.गणेश नगर, इंडीया गॅरेज रोड जळगांव यांचे वापरातील मारुती स्विफ्ट डिझायर व्हिडीआय कार क्रमांक-MH-19-BU-3178 चोरुन नेली होती.नमुद गुन्हयाची माहिती धुळे जिल्हा घटकांत प्राप्त झाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील,पोलीस हवालदार किशोर खैरनार, अविनाश गहिवड, कुणाल पानपाटील, उमेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील, कुणाल शिंगाणे, धिरज सांगळे अशांनी पोलीस अधीक्षक, धुळे – श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उप-विभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनांत व सुचनेप्रमाणे धुळे ते चाळीसगांव रोडवर शिरुड चौफुली जवळ रात्रगस्त दरम्यान वाहन तपासणी मोहीम सुरू केली व त्यात संशयीत अशफाक शेख मुस्ताक वय-25 रा.100 फुटी रोड जामचा मळा सुफी मस्जिद जवळ धुळे याचे कब्जात मिळून आलेली पांढ-या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर व्हिडीआय कार विषयी विचारपूस केली असता त्याने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच त्याची हालचाल संशयीत असल्याने त्याच्या कब्जात असलेली मारुती स्विफ्ट गाडीच्या इंजिन आणि चेचीस क्रमांकाची खात्री केली असता नमुद वाहनाचा क्रमांक-MH-19-BU-3178 असाअसल्याचा व ती जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपराध क्रमांक-221/2024 गुन्हयात चोरीस गेलेली वाहन असल्याचे निष्पन्न झाल्याने नमुद संशयीतास व वाहन ताब्यात घेतले आहे व पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलीस ठाणे जळगांव यांचेशी संपर्क साधुन संयुक्त कार्यवाही सुरू आहे.