*नंदुरबार जिल्ह्यात रामगिरी महाराज विरोधात गुन्हा नोंद झालाच पाहिजे, मुस्लिम समाजाचे पोलीस अधीक्षकांना साकडे* नंदुरबार : दि 20 ऑगस्ट ( फिरोज खान ) संपूर्ण इस्लाम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत मोहम्मद (स)यांच्याबाबत अपशब्द वापरून त्यांचा व संपूर्ण मुस्लिम समाजाचा अपमान करणारे एवढेच नव्हे तर इस्लाम धर्माला अन्याय व अत्याचार करणारा धर्म म्हणून संबोधणारे रामगिरी महाराज याच्यावर अद्याप नंदुरबार जिल्ह्यातील एकही पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद न झाल्याने नंदुरबारतील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मुस्लिम समाजाच्या शिष्ट मंडळाने पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांची भेट घेऊन त्यांना जिल्हा वासियांच्या तीव्र स्वरूपाच्या भावना निदर्शनास आणून दिले व त्वरित जिल्ह्यात गुन्हा दाखल करा अशी मागणी केली.*पोलीस अधीक्षकांचे आश्वासन*सदर प्रकरणी अभ्यास करून व माहिती जमा करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी शिष्टमंडळाला दिले. याबाबत सैय्यद रफअत हुसैन यांनी दिनांक 16 ऑगस्ट रोजीच नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे सुपूर्द लेखी फिर्याद केली आहे ज्याची एक प्रत पोलिस अधीक्षक यांना ही देण्यात आली.शिष्टमंडळात यांचा होता समावेशतक्रारदार व समन्वयक AIMIM उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष सैय्यद रफअत हुसैन, माजी नगराध्यक्ष परवेज करामत खान ( मक्कु शेठ ), माजी नगर सेवक हारून रशीद हलवाई, जमियतचे अध्यक्ष मौलवी जकरिया, हाजी इरफान मेमन, इस्माईल दगु फाउंडेशनचे अध्यक्ष एजाज बागवान, AVHF चे अध्यक्ष अरिफ शेख, समाज सेवक डॉ. मतीन शेख आदींचा समावेश होता.