चोपडा तालुक्यात अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार!
जळगांव || दि.२४ ऑगस्ट || (पुनम महाजन) -: जळगांव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातएका गावात आदिवासी समाजातील बारा वर्षे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घटना उघडकीस आली आहे . 23 ऑगस्ट रोजी दुपारी 02 वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी सौरव महेंद्र पाटील याने गावातील महाविद्यालया जवळील मक्याचा शेतात बारा वर्षीय आदिवासी मुलीचा हात धरून मक्याचा शेतात घेऊन जाऊन अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात भा.न्या.सं.२०२३ चे कलम ६४(१), ३५१ (२) (३), तसेच अनु. जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम १९८९ चे कलम ३(१)(W)(i)(ii), ३(२) (v) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,८ प्रमाणे.गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे करत आहे