मोटारसायकलची समोरासमोर धडक एक जागीच ठार…
अमळनेर || दि.०२ सप्टेंबर २०२४ || (रिजवान मन्यार ):- अमळनेर तालुक्यातील पिंपळी गावाजवळ दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात एक मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला आहे तर समोरून येणारा दुसरा देखील जखमी झाला आहे. सुरेश पुंडलिक महाजन असे ठार झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. तर समोरून धडक दिलेल्या नासिर फकीर हा जखमी असून तो रुग्णालयात उपचार घेत आहे.
दरम्यान मयत संजय महाजन यांच्या मामा संजय पितांबर शेलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात नासिर फकीर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.