अमळनेर येथे रेल्वे कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला, एक जखमी…
अमळनेर || दि.०७ सप्टेंबर २०२४ || (रिजवान मन्यार ): आदल्या दिवशी झालेल्या वादावरून तिघांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या दोन कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना अमळनेर येथे घडली.
या हल्ल्यात एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून दुसरा कर्मचारी थोडक्यात बचावला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या वादात एका रिक्षाचालकाने रेल्वे अभियंत्यावर कट मारल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना मध्यती करून भांडण मिटवले होते.
याचा रागातून तिघांनी मिळून कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला केला.
हल्ल्यात एका कर्मचाऱ्याच्या हाताला गंभीर जखम झाली असून दुसऱ्या कर्मचाऱ्याला गणवेशाच्या पट्ट्यामुळे गंभीर इजा टळली. जखमी कर्मचाऱ्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून तिसऱ्या आरोपीला पकडण्यासाठी शोध सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.