अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून तिच्यावर बलात्कार; पोलिसात गुन्हा दाखल..
अमळनेर || दि.१० सप्टेंबर २०२४ || (रिजवान मन्यार):- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस पळवणे एकास चांगलेच महागात पडले असून त्यावर अपहरणाच्या गुन्ह्यात बलात्कार, पोस्को सारख्या कलमांची वाढ झाली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक १४ जून २०२४ रोजी मांडळ येथील दीपक जगदीश पाटील याने अमळनेर तालुक्यातीलच एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले होते. या मुलीसोबत त्याची ओळख ती शाळेत जाताना झाली होती. हिच्यावर त्याच पहिल्याच नजरेत प्रेम झालं, नंतर दोघांची ओळख प्रेमात बदलली. काही कारणांनी त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.
मात्र मुलगी अल्पवयीन हे दीपकला माहीत असून त्याने तिला पळवून नेले, अमळनेर येथून निघून त्यांनी जवळ – जवळ दोन राज्याची भ्रमंती केली, तीन दिवसांपासून मुलीचा शोध लागत नाही म्हणून तिच्या आई – वडिलांनी मारवड पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
त्यानुसार पोलिसांनी दोघांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. काल दोघांना मारवड पोलिसात हजर केले असता मुलीने दिलेल्या जबाबावरून दीपक जगदीश पाटील याच्यावर भारतीय दंड संहिता ३६३, ३६६ नुसार अपहरण, ३७६ (२)(N) , नुसार बलात्कार, पोस्को अधिनियम कलम ४,८,१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील हे करीत आहेत.