निजामपूर पोलीस ठाण्यातच महिला पोलिसाचा विनयभंग

निजामपूर पोलीस ठाण्यातच महिला पोलिसाचा विनयभंग

निजामपूर दि .१२ सप्टेंबर ( सैय्यद परवेज )

धुळे साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचा विनयभंग पोलीस स्टेशनमध्येच झाल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी घडली आहे.

आरोपी हा त्याच्या मोबाईलमध्ये पीडितेचे चित्रण करत होता. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

निजामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली ३२ वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबल ही सकाळी ११ वाजेच्या सुमारास आपले दैनंदिन काम करत होती.

त्यावेळी मनिष आपू बहिरम (३२), रा. नवापाडा, ता. साक्री, जि. धुळे हा पोलीस ठाण्यात आला. त्याने त्याच्या मोबाईलमधून पीडितेचे एक ते दीड मिनिटे चित्रण केले.

तसेच मनाला लज्जा उत्पन्न करणारे कृत्य केले. या फिर्यादीवरून मनिष बहिरम विरूद्ध निजामपूर पोलिसांत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७८ (२), ७९
सह मुंबई पोलीस अधि. का. क. ११०, ११२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
घटनेचा तपास पीएसआय प्रदीप सोनवणे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us