महेंद्र बोरसे व सात्रीचा पोलीस पाटील विनोद बोरसे फरार..
महेंद्र बोरसे व विनोद बोरसे यांनीच गोपालवर हल्ला करण्यास सांगितले आरोपींची पोलिसात कबुली..
अमळनेर || दि.१४ सप्टेंबर २०२४ ||-: (रिजवान मन्यार):-येथील रेशन माफिया व सात्री गावाचा माजी सरपंच महेंद्र बोरसे यावर गेल्या काही दिवसांपूर्वी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सुंदरपट्टी येथील माजी सरपंच सुरेश पाटील यांचा मुलगा गोपाल पाटील यावर चाकू हल्ला झाल्याने हा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपींचा पोलीस शोध घेत होती.
यातील 3 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली तेव्हा या गुन्ह्यातील आरोपींनी कबूल केले की, सात्री गावाचा माजी सरपंच महेंद्र बोरसे व त्याचा भाऊ विनोद बोरसे या दोघांना आम्हाला गोपाल पाटील यास मारण्यासाठी सांगितले होते. अटक आरोपींनी दिलेल्या कबुली जबाब नुसार सात्रीचा पोलीस पाटील विनोद बोरसे याचे देखील नाव वाढविण्यात आले आहे. आम्हाला आमच्या रेशन दुकान कामात अडथळा आणतो म्हणून त्याला संपवायचे आहे असे सांगितले होते.
दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून महेंद्र बोरसे तर त्याच्या भावाच वाढीव नाव गुन्ह्यात आल्यापासून विनोद बोरसे देखील फरार आहे. तर रेशनच्या कामात कुणी अडथळा आणत असेल तर त्याला जीवे मारण्यासाठी सुपारी देणाऱ्या महेंद्र बोरसे याच्याकडे जेवढी दुकाने आहेत ती तहसीलदार अमळनेर यांनी काढून घ्यावीत अशी मागणी होत आहे.