मुहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त निजामपूर जमियत उलमा हिंद तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन….
धुळे || दि.१७ सप्टेंबर २०२४ || (सैय्यद परवेज )-: धुळे जिल्ह्यातील निजामपुर गावात दिनांक १७ सप्टेंबर रोजी ईद-ए मिलादुन्नबी निमित्त गावात निजामपूर बस स्टॅन्ड येथे जमियत उलमा हिंद व साई सेवा मेडिकल फाउंडेशन संचालित निर्णय जनसेवा ब्लड सेंटर धुळे वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिरात शहरातील तरुण मुले,गावातील हिंदू- मुस्लिम समाजातील जेष्ठ नेते,पत्रकार रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला.
या रक्तदान शिबिराचा आयोजन जमियत उलमा हिंद निजामपूर चे अध्यक्ष जुबेर सय्यद,मुज्जमील मिर्जा राहिक पठाण,अमीर पठाण,तौसिफ़ शेख,शाकिब पठाण,बाबा शेख,अन्वर तांबोळी,अदनान शेख,आदींनी केले होते.
व कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित म्हणून सरपंच प्रतिनिधी गजानन शाह, सपोनि भामरे साहेब,हाजी मिया बेग,हाजी,माजी सरपंच सलीम पठाण, लिएकात सय्यद,अय्युब कुरेशी,ग.स.बँक संचालक प्रकाश बच्छाव,मा.प.स सदस्य वासुदेव वाणी, सदस्य हाजी ताहीर मिर्जा, सदस्य मुस्ताक पठाण, ऍड अझहर शेख,काँग्रेस चे युसूफ सय्यद, डॉ महेश ठाकरे,सत्तर मणियार,साजिद पठाण,सादिक टेलर,लियाकत तांबोळी,जेष्ठ पत्रकार रघुवीर खारकर,सज्जाद मिर्जा,पत्रकार परवेज सय्यद,पत्रकार अकबर पिंजारी, कलाम चे अध्यक्ष फजल सय्यद,वाहब बेग, व मौलाना जुनेद, मौलाना नविद,मौलाना तौसिफ़, आदी उपस्थित होते,
कार्यक्रमाच्या सुरवातीस आलेल्या प्रमुख पाहुण्याच्या सत्कार करण्यात आला व निजामपूर पोलिस ठाण्यातील गणपती विसर्जन देखील सुरू होते यावेळी हिंदू मुस्लिम एकतेंचा संदेश म्हणून मुस्लिम बांधवानी गणेश विसर्जन च्या वेळी सपोनि भामरे व पोलिस कर्मचारी यांना गुलाब चे फुल देऊन त्या मिरवणूकीचा स्वागत देखील केला.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन अकबर शेख यांनी केले,
रक्तदान करणार्या व्यक्तिंना 6 लिटर पिण्याच्या पाणीचे जार व प्रमाणपत्र, रक्तदान कार्ड, फ्रुटी ज्युस, व बिस्किटे देण्यात आली.
अकबर शेख यांनी आपल्या मनोगतातून दरवर्षी आजच्या दिवशी मुहम्मद पैगंबर साहब यांच्या जयंतीच्या दिवशी ठेवला आहे मुहम्मद पैगंबरांनी हेच सांगितले होते कि कोणाच्याही कामात या व दुसऱ्यांचीही मदत करा अशी शिकवण दिली आहे.
पुढे त्यांनी सांगितले की हे रक्त जातपात न बघता कोणाच्या न कोणाच्या कामात येईल हीच सगळ्यात मोठी भावना आहे.असे त्यांनी सांगितले आहे.
ते इतर लोकांपर्यंत पोहोचेले पाहिजे. या हेतूने असे कार्यक्रम नेहमीच या तरुण मंडळी ठेवले पाहिजे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जमियात उलमा- ए- हिंद निजामपूर व इतर सदस्य यांनी कठोर परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा शेवटी मुज्जमील मिर्जा, जुबेर सय्यद राहिक पठाण आदी नी आभार प्रकट केले.