२ लाखांत बना आयपीएस अधिकारी सोबत मिळवा IPS ची वर्दी अन् बंदूकही; पोलिसांनी केले बोगस अधिकाऱ्याचा पर्दाफाश….
पटणा/जुमई || दि. २२ सप्टेंबर २०२४ || -: राज्यातील प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर नंतर बोगस अधिकारी आणि बनावट आयएएस, आयपीएस (IPS) यांचा भांडाफोड सध्या भारतात सुरू आहे. त्यातच एक नवीन घटना बिहारच्या जुमई जिल्ह्यातून एक नवीन धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहार सिकंदरा पोलिसांनी चक्क एका बोगस आयपीएस अधिकाऱ्याला अटक केली.
साहेब या सिकंदरा पोलीस स्टेशन मध्ये आपले स्वागत आहे. असे बोलत पोलिसांनी या ठगास अटक करुन चौकशी केली असता, विचित्र व धक्कादायक प्रकार उघडकीस आला असुन एक अज्ञात टोळीने २ लाख रुपये घेऊन याची फसवणूक केल्याचं समोर आलंय.
मिथलेश कुमार असं बोगस आयपीएस बनलेल्या तरुणाचं नाव असून तो बिहार राज्यातील लखीसराय जिल्ह्यातुन हलसी पोलीस ठाणे क्षेत्रातील गोवर्धन बिघा गावचा रहिवाशी असुन मिथलेश कुमार याची २ लाख रुपयांत फसवणूक केली आहे. नोकरीचं आमिष दाखवून तरुणांना लुटणाऱ्या टोळीचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे.
मिथलेश कुमार हा IPS वर्दी, डोक्यावर टोपी, कमरेला पिस्टल लावुन आपल्या घरा मधून स्वतःच्या बाईकवर निघाला होता. मिथलेश हा सिकंदरा चौक येथे थांबला असता त्याला पाहण्यासाठी लोकांनी तिथं गर्दी केली होती. मिथलेशचा अवतार पाहून अनेकांना ही बोगसगिरी असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे, गर्दीतील एकाने सिकंदरा पोलीस ठाण्याचे अधिकारी मिंटू कुमार सिंह यांना फोनद्वारे माहिती दिली. त्यानंतर तिथे काहीच वेळेत सिकंदरा पोलिसांनी मिथलेश कुमारला येथून ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता धक्कादायक आणि आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.
मिथलेशच्या गावाकडील भागात राहणाऱ्या एक मनोज सिंह नावाच्या व्यक्तीने पोलिसांत नोकरी लावतो म्हणत त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. मिथलेशने आपल्या मामाकडून २ लाख रुपये घेऊन मनोज सिंहला दिले.
आपल्याला पोलीस खात्यात नोकरी लागेल, या अपेक्षेने मिथलेशने पैसे दिल्याचे पोलिसांना सांगितले. विशेष बाब म्हणजे मनोज सिंहने २ लाख रुपये घेतल्यानंतर दुसऱ्यादिवशी आयपीएसची खाकी वर्दी, पिस्टल आणि टोपीही मिथलेशला दिली. त्यानंतर मी मिथलेशला वाटले आपण आयपीएस अधिकारी झालो. नवी वर्दी घालून आईचा आशीर्वाद घेऊन मिथलेश मनोज सिंहकडे उरलेले ३० हजार रुपये देण्यासाठी निघाला असता त्याच्या रंगरुप आणि हालचाल पद्धतीवरून त्याच्याबद्दल संशय निर्माण झाला. पोलिसांनी निखिलेश याला ताब्यात घेतले असून पुढील तपास बिहार पोलीस करीत आहे.