जबरी चोरी करणारे आरोपी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात….

जबरी चोरी करणारे आरोपी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात….

जळगाव || दि.२२ सप्टेंबर २०२४ || (शाहिद खान)-: जळगाव शहरातील गुजराल पेट्रोल पंपा वरील N.N. वाईन सेंटर वर दिनांक १५/०९/२०२४ रोजी काही इसमांनी दहशत माजवून वाईन शॉपचे काऊंटर मधील ५,७०,०००/- रु. रोख रक्कम काढून जबरीने घेवून गेले असल्याने मा.श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेश दिले होते.

त्यावर मा.श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोलिस उप निरीक्षक श्री दत्तात्रय पोटे, सह फौजदार विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, दिपक माळी, रविंद्र पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील स्थानिक गुहा शाखा जळगाव अशांचे पथक तयार करण्यात आले होते.

नमुद पथकातील अधिकारी व अमंलदार यांना गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की, गुजराल पेट्रोल पंपवरील एन.एन. वाईन शॉप वर दहशत माजविणारे आरोपी हे पाळधी ता. धरणगाव येथील साई मंदिरात असल्याची बातमी मिळाली.

त्यावरून नमुद पथक हे खाजगी वाहनाने साई बाबा मंदिर पाळधी येथे जावून मिळालेल्या बातमीची खात्री करून तिथे २ इस्माना पकडून त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव १) सचिन अभय सिंह चव्हाण, वय २६, रा. शंकर आप्पा नगर पिंप्राळा जळगाव, २) अक्षय नारायण राठोड, वय २२, रा. यश नगर पिंप्राळा जळगाव यांना ताब्यात घेवून त्यांनी जिल्हापेठ पो.स्टे. CCTNS NO ३०८/२०२४ भा. न्या. संहिता ३०९ (६) या गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांच्या कडून ६८५००/- रु. रोख व गुन्ह्यात वापरलेली बुलेट ताब्यात घेवून, सदर गुन्ह्याचे पुढील तपास कामी जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us