पंढरपूर येथील खंडणी, खुनाचा प्रयत्न मोक्का मधील आरोपी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात…
जळगाव || दि.२४ सप्टेंबर २०२४ || {शाहिद खान}-: पंढरपूर येथील खंडणी खुणाच्या प्रयत्ना व मोक्क मधील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलीस निरीक्षक बबन् आव्हाड यांनी गुप्त बातमी मिळाली की, त्यांने पथक तयार करुन पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार विजयसिंह पाटिल, सुधाकर आंभोरे अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भारत पाटील, त्यांच्या पथक तयार करून रवाना केले सदरचा आरोपी गेंदालाल मिल परिसरात आहे.
त्याने नमूद पथक तयार करून आरोपीला ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव पवन अनिल अधटराव (वय-२६) रा. पुंडलिक जुन्या कोर्टाच्या शेजारी पंढरपूर जिल्हा सोलापूर असे सांगितले.
सदरच्या आरोपीला पूर्व इतिहास पाहता त्याच्यावर खुनाच्या प्रयत्न, खंडणी, अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहे.
सदर गुन्ह्यात मोक्का कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे पुढील योग्य त्या तपासकामी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे ताब्यात देण्यात आले आहे. मा.श्री डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो जळगाव यांनी मा.श्री बबन आव्हाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, यांना सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील पंढरपूर
शहर पोलीस स्टेशन गु.र.नं ३५९/२०२४ भादवी कलम ३०७,३८५ या गुन्हा तिला आरोपी नामे पवन अनिल अधटराव हा जळगाव जिल्ह्यात अटक करण्यात आली होती.
सदर कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव मा. श्री अशोक नखाते, अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.