कॉल सेंटरद्वारे प्रलोभन देवुन आँनलाईन बेटींगद्वारा जुगार खेळणाऱ्यांवर रावेर पोलीसांची कारवाई…
जळगाव/रावेर || दि.२५ सप्टेबर२०२४ || {शाहिद खान}-: पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सुमनगनर, रेल्वे स्टेशनरोड, रावेर येथील दत्तु डिगांबर कोळी यांचे राहते घरात काही ईसम हे मोबाईल फोन व लॅपटॉपच्या सहाय्याने ऑनलाईन गेम अँप तयार करुन लोकांना आमिष दाखवुन त्यावर पैशांची हार जितचा खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहीत करुन त्यांना पैशांची गुंतवणुक करण्यासाठी प्रलोभन देत आहे.
अशा मिळालेल्या बातमीवरुन सपोनि अंकुश जाधव, पोहेकाँ/2201 रविंद्र वंजारी. पोना/2982 सुनिल वंजारी, पोकाँ/ 878 सचिन घुगे, पोकाँ/2752 विशाल पाटील, पोकाँ/2168 प्रमोद पाटील, पोकाँ/2059 महेश मोगरे, पोकाँ/1371 समाधान ठाकुर, पोकाँ / 2836 संभाजी बिजागरे पोकाँ / 1829 श्रीकांत चव्हाण अशांनी सदर ठिकाणी जावुन जुगार रेड केली असता.
त्याठिकाणी 1) अभिषेक अनिल बानिक वय.19 रा. मनिषनगर नागपुर 2) साहिल खान वकिल खान वय.22 रा. पन्हाना ता पन्हाना जि. खंडवा (म.प्र) 3) बलविर रघुविर सोलंकी वय. 22 रा. जावल ता.जि. खंडवा (म.प्र), 4) अंकित धर्मेंद्र चव्हाण वय.19 रा. पन्हाना ता. पन्हाना जि. खंडवा (म.प्र), 5) साहिद खान जाकिर खान वय. 19 रा. खडकवाणी ता. कसरावद जि. खंडवा (म.प्र. 6) गणेश संतोष कोसल वय.25 रा. पन्हाना ता. पन्हाना जि. खंडवा (म.प्र) असे इसम www.wood777.com या वेबसाईटवर व्हाट्सअँप द्वारे लिंक पाठवुन लोकांना वेगवेगळे ऑनलाईन जुगार खेळाकरीता प्रोत्साहन देत होते. त्यांचे कडुन 09 मोबाईल फोन, 02 लॅपटॉप, 01 लॅपटॉपचे चार्जर, 01 एक्सटेंशन बोर्ड असा एकुण 1,15,700/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सदर आरोपीतांची कृत्य महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 चे कलम 4,5 प्रमाणे होत असल्याने त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नमुद कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक, श्री. महेश्वर रेड्डी, जळगाव, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री अशोक नखाते, जळगाव. मा. सहाय्यक पोलीस अधिक्षक श्रीमती अन्नपुर्णा सिंग फैजपुर उपविभाग फैजपुर, यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सपोनि अंकुश जाधव, पोहेकाँ/2201 रविंद्र वंजारी. पोना/2982 सुनिल वंजारी, पोकाँ/ 878 सचिन घुगे, पोकाँ/2752 विशाल पाटील, पोकों/2168 प्रमोद पाटील, पोकाँ/2059 महेश मोगरे, पोकाँ/1371 समाधान ठाकुर, पोकाँ/ 2836 संभाजी बिजागरे यांनी केलेली आहे.