अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अमळनेर उपविभागीय अधिकारी व बाल विकास प्रकल्प कार्यालयावर आक्रोष मोर्चा..
अमळनेर || दि.२६ सप्टेंबर २०२४ || (रिजवान मन्यार):-अमळनेर बाल विकास प्रकल्पातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी दिनांक आज २५सप्टेंबर रोजी बुधवारी बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या बालविकास प्रकल्पाधिकारी श्रीमती प्रेमलता पाटील व उपविभाग प्रांत कार्यालयाचे जोशी साहेब नायब तहसीलदार यांना दुपारी २ वाजता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मोर्चाने जाऊन आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यांत आले त्यांनी तुमच्या मागण्या रास्त असून त्या शासनास पाठवितोअसे सांगीतले मोर्चाला सामोरे येऊन निवेदन स्विकारले .
##मागण्या खालील प्रमाणे…
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एप्रिल 2022 पासून सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे ग्रॅज्युटी लागू करा आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांना पेन्शन चा जीआर ताबडतोब काढा . तसेच अंगणवाडी कर्मचारी हे अत्यल्प मानधनात काम करीत असून त्यांना त्यांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात यावी ! आदी मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढून आपला संतप्त भावना व्यक्त केल्या .
मागण्यांचे निवेदन तालुकाध्यक्षा सौ विद्याताई पाटील उपाध्यक्षा -श्रीमती भिकुताई पाटील व सर्व सेविका मदतनीस तसेच भानुदास पाटील संघटक – सचिव यांनी निवेदन दिले .