महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी मा.मोहम्मद काजी यांच्या उपस्तित बैठक संपन्न; अमळनेर विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला मिळावे कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका..
अमळनेर || दि.२६ सप्टेंबर २०२४ || (रिजवान मन्यार):- मंगळवारी, काँग्रेस भवन जळगाव येथे दुपारी दोन वाजता अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सेक्रेटरी व उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी मा. मोहम्मद काजी निजामुद्दीन हे राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. काँग्रेस भवन पूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी गजबजून गेले होते.
त्यावेळी, येणाऱ्या निवडणुकीत अंमळनेर विधानसभेची जागा, काँग्रेस पक्षाला सोडण्यासाठी अमळनेरच्या सर्व कार्यकर्त्यांनी आग्रही भूमिका मांडली. त्यात अमळनेर ची जागा ही महाविकास आघाडीतील, काँग्रेस पक्षालाच सोडण्यात यावी कारण, बऱ्याच वर्षापासून अंमळनेर तालुक्यात काँग्रेस पक्षाचे चिन्ह, ##हाताच्या पंजावर.. निवडणूक लढवली गेली नाही. अमळनेर तालुक्यात काँग्रेसची पक्ष संघटना पूर्णतः सक्रिय असून, काँग्रेसचा कोणताही उमेदवार निवडून येण्याची परिस्थिती अमळनेरच्या ग्रामीण व शहरी भागात आहे.
जनतेला काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे व भूमिका आपलीशी वाटत आहेत. व त्यासाठी जनता स्वतःहून काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहे. म्हणून सदरची जागाही काँग्रेस पक्षालाच सोडण्याचा आग्रह अमळनेर करांनी धरला. त्यात जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप जी पवार, यांना देखील जागा सोडण्या विषयी सकले घातले. त्यावेळी अंमळनेर काँग्रेसचे ग्रामीण, शहरी कार्यकर्ते, युवक, महिला सेवा दल, असे सर्व फ्रंटल तसेच सेलचे कार्यकर्ते, पदाधिकारी एकजुटीने भूमिका मांडण्यासाठी आग्रही होते.