पवित्र पोर्टल वरील ८ जळगाव मनपा व ४ अंमळनेर नगरपालिका शिक्षकांना त्वरित नियुक्ती आदेश द्या – एकता संघटनेचे घेराव…

पवित्र पोर्टल वरील ८ जळगाव मनपा व ४ अंमळनेर नगरपालिका शिक्षकांना त्वरित नियुक्ती आदेश द्या – एकता संघटनेचे घेराव…

जळगाव || दि.२६ सप्टेंबर २०२४ || {शाहिद खान} -: पवित्र पोर्टल द्वारे जळगाव शहर महानगरपालिकेत ८ उर्दू शिक्षक तसेच अंमळनेर नगरपालिकेत ४ उर्दू शिक्षकांची निवड करण्यात आली होती सदर निवड ३० जुलै रोजी घोषित झाली त्यानंतर त्या शिक्षकांचे कागदपत्रांची तपासणी २७ ऑगस्ट रोजी करण्यात आली नियमानुसार कागदपत्रांची तपासणी केल्यावर ३ दिवसात नियुक्ती आदेश देणे आवश्यक असताना सुद्धा एक महिना झाला तरी त्यांना नियुक्ती आदेश देत नसल्याने जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती दिपाली पाटील ज्यांच्या कडे अंमळनेर नगर परिषद शिक्षण मंडळाचा सुद्धा कार्यभार आहे.

त्यांना जळगाव शहरातील एकता संघटने तर्फे घेराव घालण्यात आला व १२ शिक्षकांना नियुक्तीपत्र त्वरित देणे विषयी मागणी करण्यात आली असता त्यांनी तात्काळ आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका यांना भेटून ८ शिक्षकांचे नियुक्ती पत्र शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी देण्याचे कबूल केले तर अमळनेर नगरपरिषदेचे ४ शिक्षकांचे नियुक्तीपत्र सुद्धा सोमवार १ ऑक्टोबर पर्यंत देण्याचे अभिवचन दिले म्हणून पुढील आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी कळविले.

एकता संघटने तर्फे यांचा होता सहभाग..

राष्ट्रवादी अजित दादा गटाचे कार्याध्यक्ष नदीम मलिक, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, काँग्रेस आय वाणिज्य विभागाचे जिल्हाध्यक्ष सलीम इनामदार, प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष युसुफ खान, सिकलगर फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान, इदगाह ट्रस्टचे माजी सचिव अनिस शाह, मिजान फाउंडेशनचे कासिम उमर, राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक उपाध्यक्ष सय्यद इमरान अली यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us