गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या संशयताला अटक रावेर पोलिसांची कारवाई…
जळगाव/रावेर || दि.२७ सप्टेंबर २०२४ || {शाहिद खान} -: तालुक्यातील कुसुंबा ते लालमाती रस्त्यावरील जल्लारशा बाबतच्या दर्गाजवळ गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या संशयित आरोपी जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि रावेर पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे. त्याच्याकडून २२ हजार रुपये किमतीचा गावठी पिस्तूल आणि दोन मॅक्झिन जप्त करण्यात आले आहे. अब्दुल अनिस अब्दुल मजीद (वय-४६) रा. वडी खानका मुस्लिम कॉलनी खडका रोड भुसावळ जि. जळगाव असे अटक करण्यात आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की,
रावेल तालुक्यातील कुसुंबा ते लालमाती रस्त्यावरील जल्लारशा बाबाच्या दर्ग्याजवळ एक जण गावठी पिस्तूल विक्रीसाठी येत असल्याची गोपनी माहिती मिळाली.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मा. पोलीस अधिक्षक अशोक नखाते, अप्पर पोलीस अध्यक्ष जळगाव, श्रीमती अन्नपूर्णा सिंग मॅडम, सहायक पोलिस अधीक्षक रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथकातील त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पक्षातील पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, तसेच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे विष्णू बऱ्हाटे, विनोद पाटील, ईश्वर देशमुख ,राहुल महाजन, यांनी कारवाई करत संशयित आरोपी अब्दुल अनिस अब्दुल मजीद रा. भुसावळ याला अटक केली त्याच्याकडून गावठी बनावटी पिस्तूल आणि दोन मॅक्झिन असा एकूण २२ हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी लागेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेच्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहे