दुचाकीसह मोबाईल चोरणाऱ्याला दोघांना अटक ; एलसीबीची मोठी कारवाई…!
जळगाव || दि.०२ ऑक्टोंबर २०२४ || {शाहिद खान}-: शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी आणि मोबाईल शोरूम येणाऱ्या दोन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी ३ वाजता पिंपळाला उडतो परिसरातून अटक केली आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, शोएब अफजल खान पठाण (वय-२३) आणि शेख आवेश शेख मोहम्मद (वय-२९) दोन्ही रा. पिंपराळा हुडको जळगाव, असे अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपीचे नाव आहे. जळगाव शहरातील कोर्ट चौकात, सुभाष चौक, नेहरू चौक, या ठिकणिहून तू चाकी तर खोटे नगर भागातून मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेल्याच्या घटना घडल्या होत्या.
यासंदर्भात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केले होते. चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी शोएब अफजल खान पठाण आणि शेख आवेश शेख मोहम्मद हे दोन्ही चोरीच्या दुचाकीवरून पिंप्राळा हुडको भागात फिरत असल्याची गोपनी माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी मंगळवारी पथकाला कारवाई करण्याचे सूचना दिल्या.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, साहेब फौजदार रवी नारखेडे, संजय हिवरकर, पो.कॉ संघपाल तायडे, मुरलीधर धनगर, हरिलाल पाटील, पोलीस नाईक प्रवीण भालेराव, यांच्याचा पथकाने कारवाई करत दोघांना अटक केली आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अध्यक्ष श्री डॉ महेश्वर रेड्डी, सो मा. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री संदीप गावित, यांच्या मार्गदर्शनाखाली मा पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शन करण्यात आले आहे.
त्यानंतर चोरीच्या गुन्हाची कबुली दिली असून चोरीच्या दोन दुचाकी आणि मोबाईल जप्त केला आहे. दोघांना शेअर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दोघांना शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ भास्कर ठाकरे करीत आहे.