चोरीच्या तीन दुचाकीसह दोघांना अटक; एमआयडीसी पोलिसांची कारवाई..!
जळगाव || दि.०४ ऑक्टोंबर २०२४ || {शाहिद खान}-: जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना घडत असतांना नुकतेच जळगाव तालुक्यातील उमाळा बसस्थानक समोर दोन चोरट्यांना पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या एकूण ३ दुचाकी जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी दुपारी केली आहे. काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता असून याबाबत चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथील रहिवाशी भूषण झांबरे १९ सप्टेंबर रोजी कामाच्या निमित्ताने (एम.एच १९ बीएल ९३३४) या दुचाकी वरण जळगाव कडे येत असताना रस्त्यावरील उमाळा बसस्थानका जवळ नाश्ता करण्यासाठी थांबले.
त्यावेळी अख्या चोट्यांनी अवघ्या २० मिनिटात हे त्यांची दुचाकी चोरून नेली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान कुसुंबशिवरातील काही मुलांनी उमळा गाव परिसरातून काही दोन-दचाकी चोरून पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना माहिती मिळाली. या गुन्ह्याचशोध घ्या अशा सूचना पोलीस निरीक्षक दत्तात्राय निकम यांनी दिल्या.
पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, पो.कॉ दत्तात्रय बडगुजर, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, नितीन ठाकूर, नाना तायडे, किरण पाटील, गणेश ठाकरे, ललित नारखेडे, यांनी कारवाई करत संशयित आरोपी पवन उर्फ भांजे गणेश पाटील (वय-२२) आणि निखिल जयराम पाटील (वय-२१) दोन्ही रा. इंद्र नगर कुसुंबा या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीचे एकूण तीन दोन चाकी हस्तगत करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे हे करीत आहे.