यती नरसिंहानंद यावर गुन्हा दाखल करून अटक करा – एकता संघटनेची मागणी….
जळगाव || दि.०४ऑक्टोंबर २०२४ || {शाहिद खान}-: उत्तर प्रदेश येथील गाजियाबादच्या लोहया नगर येथील हिंदी भवन मध्ये अमर बलिदानी मेजर आसाराम व्याग सेवा संस्थांच्या माध्यमाने आयोजित एका कार्यक्रमात दासना देवी मंदिराचे पिठाधीश्वर यती नरसिंहनंद यांनी आपल्या भाषणात इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद (स) यांच्याबाबत अपशब्द वापरले एवढेच नव्हे तर त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले व त्यांनी भारत भरात जो हिंसाचार होत आहे त्याला जबाबदार मोहम्मद असल्याचे त्यांनी म्हटले त्या विरोधात जळगाव जिल्हा एकता संघटना तर्फे माननीय जिल्हा दंडाधिकारी आयुष प्रसाद यांच्या कार्यालयाबाहेर दुपारी ३ ते ४ निदर्शने करण्यात आली.
निदर्शनानंतर जिल्हा दंडाधिकारी यांना यती नर्सिहानंद गिरी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली सदर तक्रारीची प्रत माननीय पोलीस अधीक्षक जळगाव व पोलीस निरीक्षक जिल्हा पेठ पोलीस स्टेशन जळगाव यांना सुद्धा देण्यात आली असून यात मागणी करण्यात आली आहे की मुस्लिम धर्मियांच्या भावना व आस्था दुखावल्याबद्दल तसेच दोन समाजात तेढ निर्माण केले म्हणून भारतीय न्याय साहिंता कलम १९६,१९७,२९९ व ३०२ प्रमाणे नरसियानंद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी.
आंदोलन स्थळी यांनी केले मार्गदर्शन…
संघटनेचे समन्वय फारुख शेख यांनी सदर घटनेबाबत माहिती देऊन गाजियाबाद व महाराष्ट्रातील ठाणे मुंब्रा पोलीस ठाण्यातील एफ आय आर बाबत विस्तृत माहिती दिली. मौलाना कासिम व मौलाना तोफीक शाह, अनिस शाह,नदीम मलिक, मजहर पठाण, रियाज बागवान, सलीम इनामदार यांनी अंतिम प्रेषितां बाबत माहिती विशद करून त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोपाबाबत निषेध व्यक्त करून अटक करण्याची मागणी केली.
निदर्शनात यांची होती उपस्थिती..
फारूक शेख, नदीम मलिक, मजहर पठाण, मतीन पटेल अमजद पठाण, अन्वर खान, नदीम काझी, सलीम इनामदार, युसुफ खान, आनिस शहा, हाफिज रहीम पटेल, नगरसेवक रियाज बागवान, आरिफ देशमुख, बाबा देशमुख, डॉक्टर शोएब पटेल, मतीन सय्यद, मुजाहिद खान, मोहसीन युसुफ, शेख अख्तर वसीम शेख अशपाक , तऊहिद बेग, वसीम चौधरी, मोहसीन खान, आबिद मिर्झा, अनिश शेख, फिरोज शेख, शरीफ बाबा, अशपाक मिर्झा, कासिम उमर, इमरान खान, जकी पटेल, शिबान फैज, रिजवान शेख, खालिद शेख, मतीन खान, शाहरुख पटेल, अरमान पटेल, अझहर शेख, उमर पटेल, आसिफ शेख आदींची उपस्थिती होती.