नरसिंहानंद गिरी विरोधात गुन्हा दाखल करा; पोलीस अधीक्षकांना मुस्लिम समुदायाचे साकडे….

नरसिंहानंद गिरी विरोधात गुन्हा दाखल करा; पोलीस अधीक्षकांना मुस्लिम समुदायाचे साकडे….

जळगाव || दि.०४ऑक्टोंबर २०२४ || {शाहिद खान}-: नार्सिहानंद गिरी यांनी गाजियाबाद येथील लोहिया नगर मध्ये अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद (स) यांच्याबाबत अपशब्द व आपत्ती जनक भाषा वापरली म्हणून त्याच्या विरुद्ध जळगाव येथील कोणत्याही एका पोलीस स्टेशन ला भारतीय न्याय संहिता कलम १९६, १९७,२९९ व ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करा व अटक करा अशी एक मुखी मागणी जळगाव एकता संघटना व अहेले सुन्नत जमात तर्फे संयुक्तरीत्या करण्यात आली.

एकता संघटनेचे फारुक शेख व अहेले सुन्नत जमात चे अयाझ अली व त्यांच्यासोबत शिष्ट मंडळाने संयुक्त रीत्या पोलीस अधीक्षकांना तक्रार अर्ज सादर केला व जळगाव जिल्ह्यातील 33 पोलीस स्टेशन पैकी एका पोलीस स्टेशनला सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी साकडे घातले असता त्यांनी अभ्यास करून निर्णय घेतो असे सांगितले.

गुन्हा दाखल न झाल्यास धरणे आंदोलन व साखळी उपोषण….

येत्या तीन दिवसात नर्सिहानंद गिरी विरोधात गुन्हा दाखल न झाल्यास एक दिवसीय जिल्हास्तरीय धरणे आंदोलन करण्यात येतील व त्यानंतर साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात येईल असे फारुक शेख, अयाझ अली, नदीम मलिक, अमजद पठाण ,मझर पठाण, अनिस शाह, नाजिम पेंटर यांनी घोषित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us