धारदार शास्त्राच्या धाक दाखवून बकऱ्या चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक..
जळगाव || दि.०४ऑक्टोंबर २०२४ || {शाहिद खान}-: चाळीसगाव तालुक्यातील शास्त्राच्या ताकावर बकऱ्या चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. चेतन गायकवाड, गोरख फकीरा, गायकवाड, बबलू आबा जाधव, गोरख सुरेश गोकुळ, सोमनाथ भिकन गायकवाड, व शंकर मोरे सर्व रा. (भवाळी तालुका चाळीसगाव) असे अटक करण्यात आलेल्या टोळीतील सदस्यांची नाव आहेत.
गोकुळ गायकवाड व शंकर मोरे अशी पोलीस मागावर असल्याची चाहुल लागल्याने फरार झालेल्या दोघांची नावे आहेत.
मिळालेले माहिती अशी की,
हिंगोणा तालुका चाळीसगाव येथील एका शेतात खाटीवर झोपलेल्या इसमास शास्त्राच्या धाग दाखवून या सर्वांनी १९ बोकड व ७ बकऱ्या चोरून नेल्या होत्या. अटकेतील ५ चोरट्यांनी बोकड व बकऱ्या चोरून विक्री केल्यानंतर आलेले रोख रक्कम आपसात वाटून घेतली होती. त्यांच्याकडून १ लाख ९ हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली २६ हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सादर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, हेट कॉन्स्टेबल संदीप पाटील, हरिलाल पाटील, मुरलीधर धनगर, परवीन भालेराव, महेश पाटील, सागर पाटील, ईश्वर पाटील, दीपक चौधरी आदींनी या कारवाई केली.