मोटरसायकल चोरी करणारा अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक…
जळगाव || दि.०६ ऑक्टोंबर २०२४ || {शाहिद खान}-: जळगाव जिल्ह्यात सध्या जास्त प्रमाणात मोटरसायकल चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने सदर आरोपीतांचा शोध घेवून त्यांचावर कारवाई करण्याचे आदेश मा.डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बबन आव्हाड स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव व पोलिस उप.निरी. राहुल तायडे, दत्तात्रय पोटे, सहा.फौ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, रणजीत जाधव, दिपक चौधरी सर्व नेम.स्था.गु.शा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेलं गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की रविंद्र उर्फ राहुल पाटील व दिपक ज्ञानेश्वर पाटील हे सोबत मोटर सायकल चोरी करून वापरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथकाने अमंलदार यांनी मोठ्या शिताफिने ताब्यात घेवून त्यांन विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सांगीतल्या प्रमाणे त्याचे कडून १,०५,०००/- रु. किं.च्या ६ मोटर सायकल जप्त करण्यात आल्या असून त्याबाबत १) पारोळा पो.स्टे. १३/२०२४ भादवि कलम ३७९, २) भडगाव पो.स्टे.ला गुरनं ३४५/२०२४ भा.न्या.सं.३०३ (२) प्रमाणे जळगाव जिल्ह्यात गुन्हे दाखल असून उर्वरीत ४ मोटार सायकल ह्या पुणे व मुंबई येथून चोरी केल्याचे सांगीतल्याने त्याबाबत शोध सुरु आहे.
सदरची कारवाई मा.डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.