नंदुरबार न.पा क्र. १२ चे मुख्याध्यापक चव्हाण सर यांची नॅशनल चॅम्पियनशिप ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड…
नंदुरबार || दि.०७ ऑक्टोंबर २०२४ || (फिरोज खान)-: नाशिक येथे दिनांक 23 ते 25 ऑक्टोंबर रोजी तिसरी नॅशनल चॅम्पियनशिप अथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून नंदुरबार जिल्ह्यातून एकमेव स्पर्धक करणसिंग चव्हाण यांची ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे .

चव्हाण यांनी वयाच्या 48 व्या वर्षी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन राज्यात ब्याक रनिंग मध्ये प्रथम क्रमांक मिळविले होते. त्यावेळी चव्हाण यांनी मुलाखत देताना सांगितले होते की भारत देशात ॲथलेटिक्स स्पर्धेत वयाच्या 50 व्या वर्षी सहभाग नोंदवून देश पातळीवर एक चांगल्या प्रकारे यशस्वी खेळाडू म्हणून देशवासियांनी पहावे असे ठरविले होते.
त्यानुसार आज करणसिंग चव्हाण यांचा स्वप्न साकार होतांना दिसत आहे. ते पुरुष गटातून 50 ते 55 वयोगटात 100 मीटर धावणे, 5 हजार मीटर (5 K.M. धावणे) 5 हजार मीटर चालणे, तिहेरी उडी (लंगड, झेप, उडी) या इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट करणारे ते नंदनगरीतील कदाचित पहिले व्यक्ती असू शकतात.
त्यांची ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नंदुरबार नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा रत्नाताई रघुवंशी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, नंदुरबार नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे न.प.व खा.प्र. शाळेतील शिक्षक बंधू भगिनींनी व समाज बांधवांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.