तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे संघटनात्मक मजबुती करण्यासंदर्भात आढावा बैठक उत्साहात संपन्न..
अमळनेर || दि.११ ऑक्टोबर २०२४ || (रिजवान मन्यार):- तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे संघटनात्मक मजबुती करण्यासंदर्भात महत्त्वाची बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह अमळनेर येथे ज्येष्ठ काँग्रेस नेते शांताराम बापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष भगतसिंग बापू पाटील अविनाश भालेराव अमळनेर काँग्रेस जेष्ठ नेते डॉक्टर अनिल शिंदे कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सुरेश दादा पाटील किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील काँग्रेस नेते धनगर अण्णा पाटील नगरसेवक नरेंद्र संधान शिव एडवोकेट रज्जाक शेख आधी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन माजी शहराध्यक्ष मुन्ना शर्मा यांनी केले आभार प्रदर्शन संजय पाटील सर यांनी मानले यावेळी काँग्रेस संघटना वाढावी व अमळनेरला काँग्रेसचे तिकीट मिळावं यासाठी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर प्रमुख अतिथी यांनी आपले मार्गदर्शन केले.
यावेळी तालुका व शहरातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी युवक काँग्रेस सेवा दल अल्पसंख्यांक आघाडी किसान काँग्रेस यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते..