विजेच्या तार चोरी करणारा आरोपी अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात…

विजेच्या तार चोरी करणारा आरोपी अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात.

जळगाव || दि.१२ऑक्टोंबर २०१४ || {जळगाव शहर प्रतिनिधी शाहिद खान}-: मा.श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो. जळगाव, यांनी जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे शेतातील इलेक्ट्रीक पोल वरील तार चोरीचे प्रमाण वाढले होते. त्याबाबतचे गुन्हे उघउकीस आणणे बाबत आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दिलेत.

त्यावरुन मा.श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोउपनिरी श्री राहुल तायडे, पोह संदिप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, विलास गायकवाड, राहुल बैसाणे, गोरख बागुल, भारत पाटील सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.

वर नमुद पथकातील अधिकारी व अमंलदार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे कासोदा व एरंडोल शेत शिवारातील इलेक्ट्रीक पोलवरील तार चोरी करणारे इसम एरंडोल शहरात संशयीतरीत्या फिरत असल्याची बातमी मिळाल्याने त्यांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्यांची नावे अनुक्रमे १) रविंद्र अनिल मिस्तरी वय ३८ रा. साई नगर, एरंडोल ता. एरंडोल जि. जळगांव, २) धनराज प्रकाश ठाकुर वय ४६ रा. अमळनेर दरवाजा, एरंडोल ता. एरंडोल जि. जळगांव, ३) समाधान नारायण पाटील वय ४५ रा. नारायण नगर, एरंडोल ता. एरंडोल जि. जळगांव असे सांगीतले. त्यावेळी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी शेतातील तार चोरी केल्या बाबत कबुली दिली असून त्यांचे कडून १) एरंडोल पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गु.र.नं. १३/२०२४ भा.द.वि. कलम ३७९, २) एरंडोल पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गु.र.नं. ७९/२०२४ भा.द.वि. कलम ३७९, ३) एरंडोल पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गु.र.नं. १२७/२०२४ BNS कलम ३०३ (२), ४) एरंडोल पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गु.र.नं. १३५/२०२४ BNS कलम ३०३ (२), ५) कासोदा पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गु.र.नं. १५१/२०२४ BNS कलम ३०३ (२) असे एकुण ५ गुन्हे उघडकीस आणले असून त्यांचे कडून १,५०,०००/- रु कि.ची ३८०० मीटर विजेची तार

हस्तगत करण्यात आली असून सदर आरोपीतांना पुढील तपासकामी एरंडोल पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा.श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधिक्षक जळगांव व मा. श्रीमती. कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगांव यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us