नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवारासोबत पाचव्यक्ती व ताफ्यात तीनच वाहने असावीत; जिल्हादंडाधिकारी डॉ.मित्ताली सेठी…

नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवारासोबत
पाच व्यक्ती व ताफ्यात तीनच वाहने असावीत जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

नंदुरबार, || दिनांक १९ ऑक्टोंबर २०२४ || {फिरोज खान}-: नंदुरबार जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करताना येणाऱ्या उमेदवारांसोबत पाच व्यक्ती तसेच उमेदवारांच्या वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहनांचा समावेश नसावा, अशा आशयाचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा डॉ. मित्ताली सेठी यांनी काढले आहेत.

ओर

जिल्हाधिकारी श्रीमती सेठी यांनी म्हटले आहे की, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम घोषित केला आहे. त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून वरील आदेश देण्यात आले आहेत. तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात पाच व्यक्ती उपस्थित राहतील. या व्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करताना कार्यालयाच्या परिसरात मिरवणुका, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे, कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. त्यानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार सदरचे आदेश देण्यात आले आहेत. सदरचे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचा भंग केल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हादंडाधिकारी श्रीमती सेठी यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us