जळगाव एमआयडीसी पोलीसांची कौतुकास्पद कामगीरी सलग 150 कि.मी. CCTV फुटेज चेक करीत लावला कार चोरी करणाऱ्या आरोपीताचा छडा…

जळगाव एमआयडीसी पोलीसांची कौतुकास्पद कामगीरी सलग 150 कि.मी. CCTV फुटेज चेक करीत लावला कार चोरी करणाऱ्या आरोपीताचा छडा…

जळगाव || दि. १९ ऑक्टोंबर २०२४ || {प्रतिनिधी शाहिद खान}-: जळगांव शहरातील आयोदया नगर, एमआयडीसी जळगांव येथुन फिर्यादी यांची घरासमोर पार्क केलेली कार अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आल्याने या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अधिक माहिती अशी की, दि.03/10/2024 रोजी रात्री 1.30 वाजेच्या सुमारास दिपक जगदीश खडके रा.आयोदया नगर जुनी वसाहत एमआयडीसी जळगांव यांच्या मालकीची सिल्वर रंगाची मारुती सुझुकी कंपनीची स्वीप्ट डीझायर कार क्रमांक MH-02-CW-0906 ही घराच्या गेट समोर पार्क केली होती.

सकाळी 07 वाजता दिपक खडके झोपेतून उठून घराबाहेर आले असता त्यांना त्यांची कार घरा समोर दिसून आली नाही. त्यांनी सदर कारचा आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला परंतु कार बाबत काही एक माहिती मिळून न आल्याने व कार चोरी झाल्या बाबत खात्री झाल्याने दिपक खडके यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरोधात कार चोरी केल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्या नंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दोन टिम तयार करुन पोलीस स्टेशन ला CCTV फुटेज वर काम करणारे पोकों राहुल रगडे, पोकॉ विशाल कोळी व पोकों राहुल घेटे अशांची टिम तयार करुन सदर चोरी झालेल्या कार बाबत शोध घेण्याचे आदेश दिले होते.

पोकॉ राहुल रगडे, पोकों विशाल कोळी व पोकॉ राहुल घेटे यांनी सलग 150 कि.मी. रोडाचे फुटेज चेक करत व तांत्रीक पद्धतीने सदरची कार चोर हे ही संभाजी नगर दिशेने गेले बाबत तसेच संपुर्ण महाराष्टात चार चाकी वाहन चोरी करणे करीता प्रसिध्द असलेला आरोपी नामे दारुद शेख मंजुर शेख रा.धाड जि. बुलढाणा यानेच सदरची कार चोरी केले असल्या बाबत माहिती मिळवली. व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शना खाली पोकॉ राहुल रगडे, पोकों विशाल कोळी व पोकॉ राहुल घेटे हे सलग चार दिवस संभाजी नगर येथे वेषांतर करुन आरोपी राहत असलेल्या परिसरातच आरोपीताचा शोध घेत राहिले.

अखेर गोपनीय बातमी द्वारे व तांत्रीक पध्दतीने आरोपीचा शोध लागल्याने आरोपी दारुद शेख मंजुर शेख याला एमआयडीसी पोलीसांनी त्याचे राहते घर सुंदरवाडी, संभाजी नगर येथून शिताफतीने ताब्यात घेतले असुन आरोपीकडे जळगाव येथे कार चोरी करण्यासाठी सोबत आणलेली पांढ-या रंगाची स्पीप्ट डीझायर MH-15-G-4887 ही कार त्याचे कडे मिळाली असुन सदरची कार आरोपी याने परभणी जिल्यातून चोरी केल्याची कबुली दिली.

परभणी येथे संपर्क करुन सदर कार बाबत माहिती घेतली असता सदरची कार चोरी झाले बाबत नानलपेठ पोलीस स्टेशन परभणी येथे गुरनं 530/2024 BNS का.क. 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल असल्या बाबत माहिती मिळुन आली आहे. त्याचे जवळ मिळून आलेल्या परभणी येथुन चोरी केलेल्या कारसह आरोपीतास ताब्यात घेऊन दि.11/10/2024 रोजी अटक करुन मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीताची 05 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली असुन आयोदया नगर एमआयडसी येथून दिपक खडके यांच्या मालकीची स्वीप्ट कार चोरी केले बाबत सदर आरोपीची चौकशी करीत आहे.

सदरची कारवाई हि मा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि दिपक जगदाळे, पोहेकों दत्तात्रय बडगुजर, पोकों राहुल रगडे, पोकों विशाल कोळी, पोकों राहुल घेटे, पोना किशोर पाटील, विकास सातदिवे यांनी केलेली असुन सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us