विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 सराईत गुन्हेगारांना धुळे जिल्ह्यासह 3 जिल्ह्यातून हद्दपार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर 3 सराईत गुन्हेगारांना धुळे जिल्हयासह 3 जिल्हयातून हद्दपार

धुळे || दि .१९ ऑक्टोंबर २०२४|| (हुसैन शेख)-:  धुळे तालुका पोलीसांची कारवाई वर्ष- 2023-2024 मध्ये धुळे तालुका पोलीस ठाणे अभिलेखावर 1) विशाल दिलीप पाटील रा.फागणे ता.जि.धुळे 2) तुषार विठ्ठल बोडरे रा.नेर ता.जि. धुळे 3) रोहन सखाराम थोरात रा. अंबोडे ता.जि. धुळे यांचे विरोधात भारतीय दंडसंहिता कलमान्वये वारंवार गुन्हे दाखल झालेले असुन त्यांनी सर्व सामान्य जनमाणसांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण केलेले असल्याने त्यांच्या अशा या कृत्यांना आळा बसावा याकरिता त्यांच्या विरुध्द दाखल गुन्हयांचा अभिलेख पाहता आगामी विधानसभा निवडणुक-2024 शांततेत व सुरळीरित्या पार पाडावी या उद्देशाने पोलीस अधीक्षक, धुळे, अपर पोलीस अधीक्षक, धुळे आणि उप-विभागीय पोलीस अधिकारी, धुळे ग्रामीण विभाग, साक्री यांचे मार्गदर्शनाखाली वरील तिनही इसमाविरूध्द पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे पोलीस उप निरीक्षक दिपक धनवटे, अनिल महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल- नितीन मच्छिद्र चव्हाण व मनोज सुभाष बाविस्कर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम वर्ष – 1951 चे कलम 56 (1) (अ) (ब) अन्वये हद्दपार प्रस्ताव तयार करून मा.उप- विभागीय दंडाधिकारी, धुळे भाग-धुळे यांचेकडेस पाठविले होते.

मा. उपविभागीय दंडाधिकारी सो धुळे भाग, धुळे यांचे आदेशावरुन
1) विशाल दिलीप पाटील रा.फागणे ता.जि. धुळे यांस धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक या जिल्हयातुन 02 वर्ष कालावधीसाठी
2) तुषार विठ्ठल बोडरे रा.नेर ता.जि. धुळे यांस धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक या जिल्हयातुन 02 वर्ष कालावधीसाठी
3) रोहन सखाराम थोरात रा. अंबोडे ता.जि.धुळे यांस धुळे जिल्हयातुन 06 महिने कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले असुन आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

वरील तिनही सराईत इसमांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण केलेल्या भितीचे व दहशतीचे वातावरण कमी होण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us