नशिराबाद हद्दीतील ॲल्युमिनियमच्या तार चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी केली अटक…
जळगाव || दि.२०ऑक्टोंबर २०२४ || {प्रतिनिधी शाहिद खान}-: नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दील भादली सब स्टेशन वरील ९०,०००/-रुपयाची ईलेक्ट्रीक ॲल्युमिनियम तार चोरी गेल्याबाबत गुरनं. २००/२०२४ बीएनएस कलम ३०३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अधिक माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस स्टेशन कडील पोका, गणेश ठाकरे, सिध्देश्वर डापकर यांना गोपनिय बातमी मिळाली की, चार ईसम हे भादली सब स्टेशन मधील चोरलेली तार घेवुन जळगाव च्या दिशेने येत आहे अशा बातमी वरुन दोन्ही पोलीस अंमलदार यांनी सदर बातमी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना सांगुन गुन्हे शोधपथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर आरोपीतांना सापळा रचुन ताब्यात घ्या अशा सुचना दिल्या.
त्यावरुन दिनांक १७/१०/२०२४ रोजी अजिंठा चौफुली जळगाव परीसरात सदर चार ईसम हे ईलेक्ट्रीक ॲल्युमिनियमचा तारसह ईच्छादेवी चौकाकडे जात असतांना दिसुन आल्याने त्यांचा पाठलाग करुन चारही ईसमांना ताब्यात घेवुन त्यांचेकडेस मिळुन आलेल्या ईलेक्ट्रीक ॲल्युमिनियमची तार बाबत विचारपुस करता सदरची तार ही त्यांनी भादली सबस्टेशन वरुन चोरी केल्याची कबुली दिली. त्यांची नावे विचारता त्यांनी त्यांचे नावे १) रहीम खान रशिद खान, २) मोसीन शहा सिकंदर शहा, ३) शाहरुख शहा सिकंदर शहा, ४) अफजल खान उर्फ फावड्या रशीद खान सर्व रा तांबापुर जळगाव अशी सांगीतली. सदरचे चारही ईसम हे एमआयडीसी पोस्टे च्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांचेवर यापुर्वी सुध्दा गुन्हे दाखल आहेत. सदर चारही जणांना ताब्यात घेवुन नशिराबाद पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात मुद्देमालासह देण्यात आले आहे.
यांनी कारवाई केली मा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोउनी दिपक जगदाळे, रामकृष्ण पाटील, पोना प्रदीप चौधरी, किशोर पाटील, योगेश बारी, नितीन ठाकुर, गणेश ठाकरे, नाना तायडे, सिध्देश्वर डापकर, अशांनी ही कारवाई केली.