खडी बनवीण्याचे मशीन व मिटर चोरणाऱ्या आरोपीस एम.आय. डी.सी पोलिसांनी भोपाळ येथून घेतले ताब्यात…
जळगाव || दि २१ ऑक्टोबर २०२४ || {विठ्ठल भालेराव}-: जळगाव एम.आय.डी.सी पो.स्टे गु.र.न 647/2024 BNS 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर तपासाच्या अनुषांघाने मा. पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम सो. यांनी सदर गुन्हा उघडकीस येण्यासाठी एक पोलीस पथक तयार केले त्यात पो.हे.काँ रामकृष्ण पाटील, पो.काँ योगेश घुगे, पो.काँ ललीत नारखेडे अशांची नेमणुक करुन तपासासंबधीत योग्य सुचना देवून सदरचे पथक हे भोपाळ येथे रवाना केले.
सदर पोलीस पथकाने मा. पोलीस निरीक्षक सो. दत्तात्रय निकम यांचे सुचनांचे ततोतंत पालन करुन या गुन्हयातील आरोपी नामे गोलु बाबुलाल राजपुत रा. रुसाल्ली ता. आरोन जि.गुना राज्य मध्य प्रदेश यास त्याचे गावापासुन 50 कि.मी लांब रामपुर येथे शिताफीने ताब्यात घेतले आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.हे.काँ रामकृष्ण पाटील यांचे कडे असल्याने त्यांनी आरोपी यास कोर्टात हजर करुन दोन दिवसाचा पो. कस्टडी रिमांड मा. श्रीमती जे. एस मोरे मँडम यांनी दिला आहे.
दोन दिवसाच्या पोलीस कडून रिमांडमध्ये आरोपी मजकुर यांचे कडुन सदर गुन्हयात चोरी गेलेला मुद्देमाल 45,000/ रु. कि.चे AJAX कंपनीचे फयुरी मशीन व 9,000/- रु. कि. चे AJAX कंपनीचे प्रिंन्टर मशीन असा शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
नमुद आरोपीतास आज रोजी मा. न्यायालयात हजर केले असता श्रीमती बढे मँडम यांनी मँ.कस्टडी रिमांड देवुन जळगाव मध्यवर्ती कारागृहात आरोपीची रवानगी केली आहे सदरची कामगीरी हि मा. पोलीस निरीक्षक सो दत्तात्रय निकम यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ रामकृष्ण पाटील, पो.काँ योगेश घुगे, पो.काँ ललीत नारखेडे असे पोलीस पथकाने केलेली आहे.