मुक्ताईनगर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक संदर्भात आढावा..
मुक्ताईनगर || दि.२१ ऑक्टोंबर २०१४ || {प्रतिनिधी.कैलास कोळी}-: मुक्ताईनगर विधानसभा-20 सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या अनुषंगाने दिनांक 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसंबंधी आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुक्ताईनगर तहसील कार्यालय येथे नामनिर्देशन कक्ष ,आचारसंहिता कक्ष, मीडिया कक्ष, कंट्रोल रूम यांना भेट देऊन मार्गदर्शन आणि आवश्यक त्या सूचना दिल्या.
यानंतर संत मुक्ताबाई महाविद्यालय मुक्ताईनगर येथे नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पोस्टमास्टर यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.
सोबतच मुक्ताईनगर निवडणूक निर्णय अधिकारी महेश जमदाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, मुक्ताईनगर तहसीलदार गिरीश वखारे, बोदवड तहसीलदार वाणी तसेच सर्व नायब तहसीलदार उपस्थित होते.